नाम अवतार कलियुगी - १६
या जगात जन्म झाला तेंव्हाच जीवाचा अनंतापासून अनंतापर्यन्तचा प्रवास सुरु झाला. जीव जगात आला आणि परम् शक्तिचा खरा खेळ सुरु झाला. अनंत रूपानी प्रकट झालेली अनंत आत्म्यात वसलेली ही शक्ति हळू हळू विश्वाच्या अंतापर्यन्त परत मूळ रुपाला प्राप्त होण हेच खर गूढ आहे.
पण हे होण न होण हे सर्वस्वी जीवाच्या हातात आहे. यांच कारण कर्मफल, ज्यायोगे हे इप्सित प्राप्त करू शकतो. आधी आपण बघितल्याप्रमाणे कर्मफलाच्या पुर्ततेशिवाय हे कस शक्य आहे. यांच प्रश्नाच उत्तर आज बघू
जेंव्हा विधात्याने ही व्यवस्था निर्माण केली, तेंव्हाच आणि त्यावेळीच , ह्या विश्वातून बाहेर पडून पुढील प्रवासात अनंताच्या जवळ जाण्याचा यत्न करू शकेल अशी व्यवस्था विधात्याने निर्माण केली. मागे मी सांगितल त्याप्रमाणे हा क्ष म्हणजेच विधाता, परम् शक्ति खुप मोठा गणितज्ञ आहे.म्हणून प्रत्येक गणिताची एक नेहमीची म्हणजेच पूर्ण पायऱ्या असलेली एक पद्धति असते गणित सोड़वण्याची. पण जो बुद्धिमान असतो तो त्यातसुद्धा सोप्पी पद्धत शोधूनी काढतो. म्हणजेच तशी पद्धत अस्तित्वात असतेच असतेच. किंबहुना एखाद गणित सोड़वण्याच्या अनेक पद्धति असु शकतात. आणि हे जऱ सत्य असेल तर , त्या विश्वनीयंत्यापर्यन्त पोचण्याच्या अनेक पद्धति असल्याच पाहिजेत.
कदाचित नवविधा भक्तामार्ग हे त्या अनेकमार्गामधील काही असावेत. यातील मार्ग हे अनेक युगांपासून तावून सुलाखून अनुभवाने सिद्ध झालेले मार्ग आहेत. पण ते विशिष्ट युगात वापरलेले वा सिद्ध झालेले आहेत. कलियुगाची परिस्थिति आणि या 3 युगातील परिस्थिति यात अनेक पटिंचा फरक आहे.
सत्ययुगात शत्रु हा पूर्णपणे वेगळ्या जगात होता जस देवलोक आणि दानव लोक. त्रेता युगात तेच एकाच जगात आले. राम रावण फक्त देश वा प्रांत वेगळे इतकंच. द्वापार युगात तेच एका घरात आले. जस कंस कृष्ण, कंस शिशुपाल, कौरव पांडव, इत्यादि . यात अजुन एक फरक इथपर्यंत होता तो म्हणजे देव व दानव हे वेगळ्या व्यक्तीच्या रुपात अस्तित्वात होत्या.
कलियुगात हेच दोघे म्हणजेच देव व दानव हे व्यक्ति म्हणून न राहता त्या व्रुत्तिमध्ये परिवर्तित झाल्यात आणि आता त्या एकाच व्यक्तित वास करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तित या दोन्ही गोष्टी असु शकतात, प्रकट स्वरुपात वा अप्रकट स्वरुपात. आणि त्या विशिष्ट वेळी विशिष्ट परिस्थितित प्रकट होऊ शकतात.
या युगात सर्व गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत, इतर युगांपेक्षा, म्हणजेच त्या शत्रुंशी लढण्याची पद्धत, शस्त्र व शास्त्र वेगळी असली पाहिजेत. कारण मैदान बदलल की डावपेच सुद्धा बदलावे लागतात. आणि सर्वात महत्वाच म्हणजे शत्रुला मारण हे खुप अशक्य गोष्ट आहे. मग यावरचा उपाय काय, आणि मार्ग कसा कढ़ायचा, हेच बघू पुढील भागात
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२०/१०/२०१७
Comments
Post a Comment