नाम अवतार कलियुगी - २०
११. नाम हे कोणत्याही वाणीने सुरु करा पण सर्वप्रथम ते सुरु करण महत्वाच आहे. कारण सुरवात झाली की नन्तर पुढच काम नामस्मरणाने आपोआप साध्य होणार आहे, हे लिहून ठेवा.
१२. महाराजांनी सांगितल्याप्रणाने नाम हे अत्यंत पवित्र , शुद्ध व सात्विक असल्यामुळे त्याला कसल्याच शुचिर्भूततेची गरज नाही.
१३. नाम हे नित्य, अविनाशी , चिरंतन आहे. म्हणजेच परम ईश्वराचे अवतार कार्य संपल्यानन्तर देह जरी नष्ट झाले तरी त्यांचे नाम युगानुयुगे टिकणार आहे. आणि कलियुगी याच अवताराने कार्य सिद्ध होणार आहे, कारण ज्याच्याशी युद्ध ते सहा शत्रु आणि ज्याने लढायचय तो अर्जुनरूपी मी एकाच देहात आहोत, म्हणजेच परम ईश्वर अवतार धारण करणार कुठे आणि लढणार कोणाशी. म्हणून हा नाम अवतार धारण करून, प्रत्येक देहातील अर्जुनाला मार्ग दाखवण्याचा वसा त्याना घ्यावा लागला. पण यात सर्वात महत्वाचा सहभाग स्वतः मीचा आहे, हे ध्यानात असुद्या.
१४. नाम सुरु केल्यानन्तर अनेक विचार, विखार सुरु होतील. त्याना येउदेत. त्यांचा माग न घेता आपण आपले नामस्मरणाचे आद्य व नित्य कर्तव्य करित राहणे,त्यात खंड नको.
१५. नाम घेताना शंका नसाव्यात , इतक्या की, मी जे नाम घेतोय ते योग्य दिशेने जात आहे की नाही, याच चिंतन व चिंता करण्याची गरज नाही.ते कार्य सद्गुरु करतील. तुम्ही फक्त नाम घ्या.
१६. नाम घेत घेत त्यामार्गात पुढे जात असतान अन्तर्मनातील उठणाऱ्या वा येणाऱ्या सर्व शंकाच निरसन यथावकाश व योग्य वेळी होईल. तुमचे तुमचे सद्गुरु त्याची काळजी घेतात , निश्चिंत असावे. तुम्ही नाम घेत आहात याचा आनंद तुमच्यापेक्षा त्यानाच जास्त होतो, तेंव्हा त्यांच्यां या आनंदात खंड न पडू देण्याची जबाबदारी आपलीच आहे
१७. कोणत्याही परिस्थितीत नामाची उदी अंगाला लावल्यानन्तर तुम्ही चिरंतन आनंदात रहा, आणि जे भोग येतील ते निमुटपणे भोगुन संपवा. नामाला त्याच कार्य सिद्ध करण्यासाठी अवधि द्या. कारण युगानुयुगे प्रारब्धी साठलेले पुसून टाकायला वेळ लागेल. कदाचित एखाद्याला त्वरित अनुभव येईल, एखाद्याला उशिरा येईल, वा येणार नाही. हे सर्व संचिताचे साठलेले धुवून गेले की पुढे फक्त आनंद आहे.
१८. नाम सुरु केल्यानन्तर त्याचे कार्य ते लगेच सुरु करेल पण यात सद्गुरु कॄपा देखील खुप महत्वाची आहे. त्या जोरावर अनेक जन्मांच्या पाप राशी सहज धुवून निघतात. हे पक्के ध्यानात असुद्या. यात तुमची गुरु निष्ठाच उपयोगी येते.
. नामस्मरणाच्या या लेखमालतील आता फक्त 2 पुष्पे बाकीं आहेत. २१वा भाग हा अंतिम असेल. त्यानंतर नवीन लेखमालेला सुरवात करीन. कोणती ते लवकरच समजेल.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२५/१०/२०१७
Comments
Post a Comment