नाम अवतार कलियुगी - ५
मन आणि बुद्धि हे, या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी, कश्या साध्य करू शकतात ते बघण्या आधी यांच कार्य आणि शक्तिस्थान पाहुया.
- सर्वसामन्यपणे बुद्धिची आकलन शक्ति, झेंप , स्मरणशक्ति, तार्किकता या सर्व गोष्टी प्रचंड प्रमाणात असतात.
- अस पाहणीत आढळलय की सर्वसामान्य पणे बहुतांश लोक आपल्या बुद्धिच्या काही टक्के अथवा नगण्य वापर देखील करत नाहीत, पूर्ण आयुष्यभर सुद्धा. अस म्हटल जात की आइन्स्टाइन सारख्या अणुवैज्ञानिकाने सुद्धा पूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त ३% मेंदुचा वापर केला. म्हणजे सामान्य माणसाची बातच सोडा.
- अजुन एक मुद्दा जो आता कुठे उजवा मेंदू यावर विश्वास आणि संशोधन सुरु झालय. आइन्स्टाइन ने उजव्या मेंदुचा वापर 3% टक्के पर्यन्त केला होता आणि अगम्य वाटणाऱ्या गोष्टी व अनुसंशोधन घडवून आणल. इथे एक उदाहरण आठवल स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्तिच.
एकदा स्वामीजी अमेरिकेत एका पूलाच्या कठड्यावर बसुन पुस्तक वाचत होते. आणि एक एक पान वाचून झाल की फाडून सामोर पेटवलेल्या शेकोटित टाकत होते. जवळ बसलेल्या एका आंग्ल स्त्रीने विचारल की तुम्ही अस का करताय. स्वामीजी उत्तरले कि वाचून झाल्यावर मला या पानाचा काही उपयोग नाही. माझ्या स्मरणात हे राहिल. त्या स्त्रीचा विश्वास बसेना , म्हणून स्वामिनी ३,४ पान वाचून पुस्तक त्या स्त्रीकडे दिल आणि सांगितल कोणताही परिच्छेद कुठेही कुठूनही विचारा किंवा फक्त पान क्रमांक सांगा. खरच त्या स्त्रीने त्यांची परीक्षा घेतली आणि थक्क होऊन पाया पडली. तेंव्हा स्वामीजी त्यावर म्हणाले की यात विशेष अस काहीच नाही, प्रत्येकाच्या मेंदुमधे ती ताकद असतेच असते. मी त्याचा योग्य वापर करण्याच शास्त्र आत्मसात केलय, तुम्ही ते जाणत नाही. पण जाणल्यास तुम्हीही ते करू शकाल.
या तंत्राच नाव आहे एकाग्रता. आणि यांच् सर्व तंत्र स्वामीजीनी आपल्या राजयोग या पुस्तकात विस्ताराने विषद केलेल आहे.
आता ही एकाग्रता काय आणि त्याची तंत्र कशी आहेत हे पुढील भागात बघुया.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०५/१०/२०१७
Comments
Post a Comment