नाम अवतार कलियुगी - १०
आता हे गणितीय सिद्धांत पाहिल्यावर एक गोष्ट पटली असेल की हे सर्व जग काही विशिष्ट नियमावर आधारित आहे. हे नियम सर्वानाच सारखे आहेत. म्हणजे असणारच. म्हणून कर्मसिद्धांतानुसार जे समोर आले ते भोगणे हे क्रमप्राप्त आहे. नव्हे तेच श्रेयस्कर आहे.
पण मग हे चक्रनेमिक्रमेण चालणार आणि आज केलेल्या कर्माचे फल उद्या वा भविष्यात कधीतरी भोगावे लागणार हे निश्चित. ह्या कालचक्राला भेद वा छेद करणे शक्यच नाही असे दिसते. कारण आज भोगतोय ते फल पूर्वीचे कधीतरी केलेले आणि ज्याची संगति लागत नाही व साठलेले कर्म किति आहे, हे ईश्वराला माहित. म्हणजे नक्की किति हिशोब बाकीं आहे हे मानवाला कधीही कळणार नाही.
अनेकानेक जन्म, साठलेल्या कर्माचा हिशोब लावण्यात खर्ची जातात, आणि तो हिशोब पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढचे कर्म फल देण्यासाठी तयार असते. याचे कारण असेकि कोणतेही कर्म है आपले फल दिल्याशिवाय शांत बसत नाही , पण त्याची विशिष्ट वेळ आल्याशिवाय समोर येत देखिल नाही., मग हेच करायचे तर अनेक मानवी जन्म नककीच जातील आणि हाती कोरी पाटी कधीच येणार नाही.
मग यावरचा सोप्पा उपाय, कर्म न करणे. पण सूक्ष्म दृष्टया पाहता असे लक्षात येईल की काहीही न करणे हे सुद्धा एक कर्मच आहे आणि त्याचाही परिणाम भोगावाच लागेल. अस मानल जात की माणूस एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना आधीच्या जन्माचा हिशोब बरोबर घेऊन जातो. पुढील जन्मी त्याच्या कर्माचा हिशोब त्याच्या DNA साख़ळीत लिहिलेला असतो आणि त्यानुसार त्याची मार्गक्रमणा या जन्मात होत असते.
आता येथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की जर या जगात आलेला जीव फक्त कर्म फल कर्म फल यांच् साख़ळीत अडकायच आहे तर मग जीवन जगण्याच प्रयोजन काय आणि पहिल्या भागात बघितल्या पाहिल्या प्रमाणे विधात्याने
सृष्टि व्यवस्था निर्माण केली आणि तिला नियमात बांधल त्यामागे काय अपेक्षा आहेत विधात्याच्या. पाहुया पुढील भागात
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/१०/२०१७
Comments
Post a Comment