नाम अवतार कलियुगी - २
मागील भागात सांगितल्याप्रमाणे ही सजीव सृष्टि निर्माण केली पण हे कार्य करताना भगवंतानी त्यामध्ये पुनर्निर्मितिची प्रक्रिया सुद्धा समाविष्ट केलेली होती, जेणेकरून एकदा ही सृष्टि निर्माण झाल्यावर, सजीव सृष्टि आपोआप पुनर्निर्मित होत राहिल आणि आपल्याला पुन्हा त्यात लक्ष घालावे लागणार नाही.
सजीव सृष्टि निर्मिति करते वेळी भगवंतानी पंचमहाभूताना आदेश दिला आणि त्यांच्यां द्वारे ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. अश्यारीतीने जीवसृष्टि निर्माण होऊन त्याच अव्याहत चालणार चक्र सुरु झाल. पण या निर्मितिने सुद्धा समाधान न मिळालेल्या भगवांतानी मग आपल्या प्रतिकृतिची निर्मिति केली. ज्याला मानव अथवा माणूस या नामाभिधानाने ओळखू लागले. तरीही काही कमतरता भासत असलेल्या श्रीनी एक अश्या गोष्टीची निर्मिति केली जी मानव शरीर व त्याअंतर्गत स्थित आत्मशक्ति वा चैतन्य शक्ति याना साधून श्रींच्या मूळ संकल्पानुसार काम करून, मानवाला इच्छित ते सर्व करण्याची व मिळवून देण्याची प्रेरणा देत राहिल. जे त्याला एका जागी थांबू देणार नाही. आणि सतत गतिमान ठेवेल व मानव प्राण्यालाही कार्यरत ठेवेल. जे चैतन्यशक्तिला सतत प्रेरित करेल. आणि जे त्याच चैतन्यशक्तिला परामशक्तिप्रत पोहोचण्यास मदत करेल. जीचा वेग आणि कार्य हे प्रसंगी प्रकाशापेक्षाही अफाट असेल आणि अचाट गोष्टी करण्याचे सामर्थ्य त्यामधे असेल.
इतकं सर्व वर्णन ज्या गोष्टिविषयी आहे ती अचाट आणि अफाट कार्य करू शकणारी गोष्ट, जी फक्त आणि फक्त मानव प्राण्याला वरदान म्हणून मिळाली ती म्हणजे 'मन '. मानवी मन जीचा थांग , वेग हा अजूनही विज्ञानासाठी खुप मोठ आव्हान आहे, आणि असेल सुद्धा. याचा अफाट वेग आणि अचाट सामर्थ्य आपल्याला आपल्या शक्तिची जाणीव करून देत, प्रसंगी कापसाप्रमाणे हळुवार मन वेळ पडल्यास वज्राहुन कठोर होऊ शकत, प्रकाशाच्या वेगाहून ज्याची गति दिव्य आहे आणि ज्याला बांधू शकण भल्या भल्याना जमत नाही. अगदी मी मी म्हणणारे या मनाच्या कार्यकक्षेपुढे हतबल असतात. ज्याच्या एका इशार्यावर मानवप्रणि काहीही अफाट कार्य करू शकतो. या चलबिचल करणाऱ्या मनाच्या अनेक अवस्था , अनेक गुणधर्म , अनेक पैलु, अनेक स्थित्यंतर आहेत. त्याचबरोबर या मनाला शरीराशी जोडण्यासाठी अजुन एक व्यवस्था जीच नाव बुद्धि अस आहे तीसुद्धा फक्त मानवप्राण्याला प्रदान केली.
खुप गुंतागुंतीची ही व्यवस्था विस्ताराने अर्थात पाहूया पुढील भागात.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०२/१०/२०१७
Comments
Post a Comment