नाम अवतार कलियुगी - ६
आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे एकाग्रता आणि त्याचा परिणाम स्वामी विवेकानंद यांच्या उदाहरणावारुन स्पष्ट होत. एकाग्र असलेल चित्त , हे बुद्धिला स्थिर करत आणि अंतरात्म्याची शक्ति विकसित करत आणि त्यात वसलेल्या शक्तिचा पूर्ण वापर करून अनेक गोष्टी बसल्या जागी घडवून आणत. एकाग्रता ही कोणत्याही क्षेत्रात मानवाला असाधारण उंचीवर नेऊन ठेवत. आणि हिच मानवाला विधात्याने दिलेली देण आहे. याची अनेक उदाहरण देता येतील.
- स्वतः स्वामी विवेकानंदजी
- अनेक संत महंत
- सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या कारकिर्दीतील फरक यांच मुख्य कारण सचिनच खेळावर एकाग्र असलेल चित्त
- दैनंदिन जीवनात आपण बघतोच की काही विद्यार्थी एकमार्गी , एकाग्रेतेने अभ्यास करतात , यशस्वी होतात आणि नाव मिळवतात. यात त्यांच्यां यशाच मुख्य गमक हे एकाग्रता हेच आहे.
आता एकाग्रता मिळवायची म्हणजे नककी काय करायच. तर मन हे एका विशिष्ट लक्ष्यावर केंद्रित करायच. वाटेत त्याला कुठेही भरकटु द्यायच नाही. आणि नेमक हेच जमण खुप दुरापास्त आहे. पूर्वी हे शक्य होत होतं कारण एकाग्रता भंग करणाऱ्या गोष्टी व माध्यम कमी होती. आताच्या काळात ते अजुन कठीण होऊन बसलय.
तरीही विशैष अभ्यासाने काही गोष्टी साध्य होऊ शकतात. अभ्यास हा कोणत्याही यशाचा पाया आहे, हे नककीच. आता एकाग्रतेचा अभ्यास कसा करायचा. इथे विशेष काळजी घ्यावी ती ही कि एक ठराविक वेळ यासाठी निवडावी आणि एखाद्या मंत्राचा , नादाचा वा जपाचा अभ्यास सुरु करावा. (जस ओंकार , वा जय श्रीराम अथवा जयश्रीकृष्ण अथवा आपले कोणी गुरु असतील तर त्यांचा जप इत्यादि. सुरवातील थोड़ा वेळच करून हळूहळू वेळ वाढवावी. पूर्ण ईमानदारीने व खऱ्या मनाने केल्यास यश नककीच.
हे सुरु केल्यानंतर कंटाळा येण, मनात भलते विचार येण, बंद करावस वाटण, मन न लागण इत्यादि अनेक अडथळे येतील. यात तुमच्या स्वतःच्या मनाचा निश्चय, जाणीव, विचारांशी बांधीलकी जपण्याची व्रुत्ति या गोष्टी उपयोगी येतील. शेवटी इच्छा शक्ति ही खुप उपयोगी पड़ते.हीच इच्छाशक्ति अनेक अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य करते (या इच्छाशक्तिवर एक लेखमाला Laws of Attractions यावर आधारित नन्तर लिहायला घेईन, त्यांमुळे त्यावर आता विवेचन इतकेच पूरे)
असा हा एकाग्रतेचा अभ्यास करत असताना अनेक वेळा मन विघ्नकारक गोष्टीत वळत. जेणेकरून त्याला एकाजागी स्थिर राहाव लागू नये. कारण मनासाठी ती सर्वात मोठी शिक्षा असते आणि आपल्यासाठी परीक्षा. पण अश्या तह्रेने तयार झालेले एकाग्र मन अनेक कामात वापरता येते. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेता येतो, सकारात्मक वा नकारात्मक दोन्ही मार्गे.
यावर पुढे चर्चा करू पुढील भागात
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०६/१०/२०१७
Comments
Post a Comment