नाम अवतार कलियुगी - १५
तीन दिवस प्रकृति ठिक नसल्यामुळे खंड पडला त्याबद्दल क्षमस्व. आज पुढे सुरु करू
मुळात एखादी गोष्ट मिळवण म्हणजेच साधण. एखाद्या गोष्टीचा योग साधण असही म्हटल जात. म्हणजेच काही विशिष्ट हेतु धरून परिश्रम करणे म्हणजेच योग साधणे.
पण साध्य म्हणजे उद्देश्य हे पूर्णपणे हितोपयोगी असेल म्हणजेच सकारात्मक असेल तरच त्या यत्नाना योग म्हटल जात. योग म्हणजे चांगल्या उद्देशाने योग्य मार्गानी व नियमित, आणि नियमात राहून केलेले प्रयास.
असेच योग्य मार्गाने साध्य साधण्यासाठी योगयुक्त प्रयत्न वा प्रयास म्हणजेच साधना.
साधना ही अनेक अंगानी केली जाते आणि त्यासाठी योगाचे म्हणजेच योग्य पद्धतिचे असलेले आठ मार्ग म्हणजेच अष्टांग योग. परमेश्वराची , परम् आत्म्याची परम् तत्वाची , परम् सुखाची, सत चित स्वरूपाची प्राप्ती करण्याचे असलेले मार्ग मुख्यातः नऊ भागात मोडतात. त्यालाच नवविधा भक्ति म्हणतात.
आपल्या आपल्या शक्तिनुसार , वेळेनुसार जमेल त्या मार्गाचा अवलंब करून भक्तियुक्त प्रयास करून अंतिम उद्देश्याप्रत पोचणे म्हणजे साधना.
मूळ प्रश्न असा आहे की हया सर्वाची गरज काय आणि रोजच्या संसाराच्या मार्गात या सर्वाची जरूरत काय आहे. आपण जन्मलो, काही कर्म केलीआयुष्यात, आणि अंति वेळ आली की मान्य असो वा नसो पण इथून निघुनपुढे जाण. पुढे कुठे जायचय, काय करायचय, नक्की पुढे आहेच का काही, की सर्व कल्पना आहे. या सर्व साधनेचा आटापिटा कशासाठी. पुढे काय आहे माहित नाही, मग का करायच हे सर्व.
असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. बघुया काही उत्तर आहेत का, मिळतायत का . पुढील भागात
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/१०/२०१७
Comments
Post a Comment