नाम अवतार कलियुगी - २१ व अंतिम
आजपर्यंत पाहिलेल्या २० भागात नाम हे कस या युगाशी निगडित आणि बहुफल देणार एकमेव साधन आहे, याचा आढावा घेतला. या लेखमालेची प्रेरणा स्वयम माझे गुरु श्री ब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज. आणि त्यांच्याच कृपेने मी हे लेखन करू शकलो. त्यांमुळे यांच्या चरणी ही २१पुष्पे वाहून या मालेची सांगता करावी हेच उत्तम.
नाम हेच या युगातील तारक आणि मारक दोन्ही आहे. कोणत्याही काळात, वेळात स्थळात घेता येणारे , सहज सुलभ , सहज साध्य अस हे साधन अनेक संत महंत यानी सिद्ध करून आपल्या हाती दिलेल आहे. हे जीवन हा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे, जन्मोजन्मिचा. म्हणून त्यासाठी लागणारे साधन सुद्धा सूक्ष्म पणे काम करणारे असावे. आणि नामस्मरण हेच ते साधन आहे जे सूक्ष्म आहे व परिणामकारक आहे. अगदी ठिबकसिंचन सारखे. शांतपणे काम करणारे.
त्याचा सुनियोजित वापर आत्मोन्नति आणि उद्धारा करता कराव ही कळकळीची इच्छा महाराजांची होती आणि आहे. फक्त आणि फक्त नाम घेऊन जगात उत्तम प्रकारे जीवन व्यतीत करून अंति मोक्षपदाला जाण्याचा मार्ग यांच् जन्मात संतानी आपल्याल्या त्यांच्या जीवनातून उदाहरणाने सांगितल आहे. किंबहुना एक सहज सोप्पी गुरुकिल्ली सर्व समस्यांवर त्यानी आपल्या हाती दिली.
त्याचाच वापर करून प्रत्येकाने आपलाच उद्धार करून घेणे हे हितावह आहे. कदाचित पूर्वसंचिताचे फल जसे असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला कमिअधिक प्रमाणात व लवकर अथवा उशिरा याचा लाभ होईल. पण नाम घेण्यास सुरवात केल्यानन्तर एक एक करुन सर्व समस्या चुटकिसरशी सुटतील अस नसल तरीही प्राप्त भोग भोगण्याची शक्ति आणि तयातून बाहेर पडण्याचा राजमार्ग नककीच सापडेल हे निश्चित .
सर्व कर्ममार्गाचा शेवट हा अंति भगवांताप्रत जातो हे सुनिश्चित. पण अनेक मार्ग आज कलियुगी आणि या एकविसाव्या शतकात प्रत्यक्षी वापरता येतील हे संभव नाही. किंबहुना काही मार्ग जस हठ योग, तप इत्यादि आताच्या जीवनशैलीत अशाक्यप्राय आहेत. म्हणून इतके सोप्पे आणि सहजसाध्य साधन उपलब्ध असताना आणि याचा परिणाम दिसून येत असताना दुसऱ्या साधनाचा विचार सुद्धा करण्याची आवश्यकता नाही.
यात सद्गुरु तुम्हाला साधनेपर्यंत नेतील आणि ते साधन साध्य करण्यासाठी सर्व मदत करतील. पण प्रत्यक्ष्य नाम घेण्याच कर्म आपल्याला करायच आहे. हे खुणगाठ बांधून ठेवा. म्हणुन नामात रहा आणि स्मरणातून सरणापर्यंतचा प्रवास सुलभ करा .
शुभमस्तु शुभंभवतु शुभेच्छा
अंति या लेखमालेला प्रतिसाद देऊन मला लिहित ठेवल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार . सद्गुरु चरणी वंदन.
लवकरच पुढील लेखमाला 'सुखाचा शोध'
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६ /१०/२०१७
Comments
Post a Comment