नाम अवतार कलियुगी - ७
मन एकाग्र करण्याच्या प्रवासात बरेच काटे कूटे आहेत. ती वाट वाटते तितकी सरळ नककीच नाही. पण चिकाटी आणि जिद्द या जोरावर मनाची एकाग्रता कठीण असली तरी मिळवता येऊ शकते. आता या मनाच्या वाटा अनेक आणि मार्ग अनेक. भले भले म्हणणारे थकतात . मार्ग कोणता योग्य हे योगावर अवलंबून आहे.
हा योग दोन अर्थाने आहे
१ योग म्हणजे योगायोग अर्थात कर्मफल असेल तर आणि तस. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की योग म्हणजे नशिब या अर्थी अगदीच घेण्याच कारण नाही. कारण फक्त याची बुद्धि होण हा योग असेल, पूर्वकर्मानुसार , तर पुढच हे जिद्दीवर अवलंबून असत.
२. दूसरा योग म्हणजे योगयाग. हे एक शास्त्रशुद्ध तावून सुलाखुन सिद्ध झालेल आणि पुराणकाळापासून अनेकांनी सिद्धि प्राप्त करण्यासाठी, कुंडलिनी जागृति साठी, एकाग्रता व चित्ताची शुद्धि आणि शांति मिळवण्यासाठी प्रयोगात आणलेले एक उपयुक्त तंत्र आहे.
योगाच्या अनेक पद्धति व पायऱ्या आहेत. आपण त्या खोलात न जाता , आपल्याला उपयुक्त आणि सध्याच्या लेखमालेच्या दृष्टीने योग्य असलेल्या तंत्राचा विचार करुया. एकाग्रते साठी मुख्यत्वे आणि काळाला सुसंगत अस एक उपयुक्त तंत्र म्हणजे ध्यान किंवा अथवा धारणा. योगाच्या श्रेणित हे खुप पुढचे टप्पे आहेत आणि समाधि व मोक्ष हेच त्यांचे अंतिम साध्य आहे.
पण आपल्याला इतकं पुढे एवढ्यात जाण्याची गरज नाही. आपल्याला त्या टप्प्याचा इतक्यात विचार नको करायला. मग यातला मध्य कसा साधावा जेणेकरून एकाग्रता साध्य होईल. याचा खुप सोप्पा मार्ग अनेक संत महंत यानी सांगितलेला आहे. आणि तो सर्वात सोप्पा मार्ग म्हणजेच नामस्मरण.
नामस्मरण म्हणजे सतत एखाद्या नामाचा जप, मनन, चिंतन, व विचार करणे. त्यावरच मन एकाग्र करण्याचा यत्न करणे. त्यात स्वतःला गुंतवून घेणे. जितका , जेंव्हा जेंव्हा रिकामा वेळ मिळेल त्या त्या वेळी या नामाचा सतत उच्चारण करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे.
आता नामच का, कस करायच, त्यांचे फायदे काय काय आहेत आणि त्याने साध्य काय होईल वा होऊ शकेल हे पुढील लेखात पाहुया.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०७/१०/२०१७
Comments
Post a Comment