नाम अवतार कलियुगी - १७
जस राजा बदलला की राज्यतंत्र बदलत,अगदी द्वारपाल सुद्धा बदलतो. इथे तर शत्रुच स्थानच बदललय. म्हणजे त्याप्रमाणे
नियम व नियमन दोन्ही वेगळ असल पाहिजे. अजुन एक भेद म्हणजे शत्रुला मारण हे अशक्य आहे कारण तो स्वतःतच वस्ती करून आहे. म्हणजे स्वहत्या हाच उपाय की काय. पण या स्वाहत्येचा विस्तृत अर्थ पुढील भागात पाहुच.
पण सांगण्याचा उद्देश हाच की शत्रु सूक्ष्म रुपात नसानसातून , धमन्यातून, अंतरातून वाहतोय. तो सहा रुपातच आहे पूर्वीच्या, पण तो परकायेत नसून आतच ठाण मांडून आहे. जी बीज आधीच्या कित्येक जन्मात आपणच पेरलित ती अनेक जन्मातुन फलित होऊन आता कलियुगी समोर ठाकलीत. असाच संदेश या युगाचा आहे. म्हणजेच आपलच युद्ध आपल्याशीच आहे.
आता या शत्रुची रूप सहा आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर . आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ति समोर येऊन आपल काम चोख करून जातायत. त्याच्या छटा अनेक, रंग अनेक, आणि मार्ग अनेक. पण मुख्य उद्देश्य मायेचा पाश आवळून जीव या जगात गुंतवून ठेवायचा म्हणजेच जन्म मरण फेरयातून सुटु द्यायचा नाही. बर कर्मगतिच्या साखळीत आधी आहेच अडकलेलो, त्यातूनी सुटण्याचा मार्ग शोधावा तर हे अजुन अडकवतात आपल्याला.
यावर उपाय नाहीच का असा प्रश्न असेल पडला, तर एक ध्यानात ठेवा, गणितात प्रत्येक प्रश्नाला जस उत्तर असतच त्याप्रमाणे, इथेहि उत्तर आहे आणि ते खुप मोठे मोठे विद्वान गणितज्ञ सोडवून गेलेत. सूक्ष्म शत्रुचा विनाश वा बिमोड करण्यासाठी तसच सूक्ष्म शस्त्र जे अनेक संत , महंत, सांगून, आचरुन आणि सिद्ध करून गेलेत ते म्हणजे नामस्मरण.
या युगातून तरून जाण्यासाठी, प्रत्यक्ष परम ईश्वराला सुद्धा अवतार घेण दुरापास्त आहे. तिथे आपली काय गत. पण अनेक संत सज्जनानी ज्या मार्गानी स्वतः बरोबर जगाच्या कल्याणाचा विचार करून आणि या युगात सर्वश्रेष्ठ अस अस्त्र भारतवर्षात सिद्ध करून दाखवल असेल तर ते नामस्मरण आहे. आणि हाच कलियुगातील ईश्वरी अवतार आहे. सूक्ष्म रुपात, सूक्ष्म देह धारण करून, सूक्ष्मपणे आपल काम करणारा, व इप्सित हेतु शांतपणे साध्य करणारा, हाच तो नाम अवतार कलियुगी
नाम माहात्म्य माझ्या गुरुंच्या श्रीब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रेरणेने आणि आज पर्यन्त त्यानी केलेल्या कृपेने जे लिहिल त्याचाच मुख्य भाग आता उद्याच्या भागात. मी आजपर्यंत या विषयात जे जे लिहिल ते तुम्ही वाचून, वेचुन ग्रहण केलत त्याबद्दल मी कृपाभिलाषी आहे. आता यांच नामरूपी शस्त्राच महत्व विषद करीन पुढील भागात.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२१/१०/२०१७
Comments
Post a Comment