ऋतुगंधित स्वरपुष्पे वाहियली तुज साठी
गंधारी मन्द्र स्वरे मी रागदारी गाईयली
त्या स्वर वेणुचे गुम्फुनि गोफ तुज भवती
स्वरतुषार करुनी तुला नित नित पाहियले
भिजलेले स्वर असेच रागांचे शुभ्र कोष
जुळवूनी या तारांचे मल्हारी सप्त छेद
बहु कोमल मृदु हृदयी तीव्र स्वरही सिंचनी
मर्मबन्ध स्वर सुगंध तव हृदयी करुनी भेद
किती गाईन स्वर ओडव, षाड़व , संपूर्णा
रागांच्या लड़ी उतरनी आल्या भुवरी मदना
तुज सम दूसरी न रति जाणीव आहे तुजला
पूर्ण करुनी मम आशा येसी झणी मम सदना
इतुकेची कोड़े हे सोडव सखी गूढ अजब
तुज परिने बहु वेळी अर्पियली स्वरसाधना
मम हृदयी तव प्रतिमा गुंतुनि आहे सखये
ऐकुनी प्रेमालापे स्विकारिसी मम भावना
कवी : प्रसन्न आठवले
२०/१०/२०१७
०७:२९
Comments
Post a Comment