नाम अवतार कलियुगी - १९
दोन दिवसाच्या विश्रांतिसाठी क्षमस्व, कार्यव्यस्ततेमुळे शक्य झाल नाही.
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की, नाम घेण म्हणजे अनेक जन्माच्या पाप पुण्याच्या हिशोबातून मुक्ति मिळवून पुढे सरकण्याचा महामार्ग. यात तुम्हाला बुद्धि झाली यातच सर्व काही आल. नाम घेताना ख़र तर कोणतेही बंधन वा नियम नाहीत, तरी सुद्धा काही गोष्टिंच नियमन करण गरजेच असत, नामाच्या खऱ्या अर्थाने मिळणाऱ्या आनंदा साठी. या गोष्टी कोणत्या ते आधी पाहुया:
१. नाम हे सूक्ष्म पणे काम करत असल्यामुळे ते ,नित्य सतत घ्यावे.
२. नामाला स्थल , काल, शारीरिक स्थिति या कशाचहि बंधन नाही ते अनेक महान संत, महंत यानी सिद्ध केलेल आणि सर्व भौतिक परिमाणांच्या पार, म्हणजेच पलीकडे आहे.
३. नाम स्वतः चिंतामुक्त करत असल्यामुळे ते घेताना कोणतीही शंका, काळजी अथवा चुकीचे विचार आणू नयेत. आलेच तरी त्याना त्यांच्यां मार्गाने जाऊ द्यावे, आपण त्या विचारांचा माग काढत बसु नये. मग ऐसे विचार आपोआप बंद होतात.
४. नाम हे परम पावन आणि अत्यंत शुद्ध आहे. त्याच्या नित्य सेवनामुळे सर्व पारमार्थिक व्याधी आपोआप ठीक होतात. शंका ठेवून वा घेऊन नाम घेणे , न घेतल्या सारखेच आहे. म्हणजे न घेणे इष्ट त्यापेक्षा .
५. नाम हे शक्यतो सद्गुरुंकडून घ्यावे , त्याच कारण अस की, त्यानंतर तुमच्याकडून नाम करवून घेण्याची जबाबदारी ते स्वीकारत असल्यामुळे, आपण चिन्तामुक्त होऊन फक्त नाम घ्यावे, त्याचे परिणाम तेच बघून घेतात. पण नाम मात्र घेणे गरजेचे आहे.
६. नाम हे जागृत अवस्थेत घेणे हे आपलं कर्तव्य आहे. सद्गुरु कृपेचा खरा प्रसाद हाच की निद्राअवस्थेत नाम करवून घेण्याच महत्त्वाचं काम गुरु करतात.
७. हरीकृपेने नाम घेण्याची बुद्धि तुमचीच असण गरजेच आहे. तिथेच सर्व जन्माची सार्थकता सिद्ध होते.
८. नाम हे चित्तव्रुत्ति शुद्ध करत असल्यामुळे, नाम घेतल्या नन्तर आपल्यात सात्विक बदल होण अपेक्षित असत, ते तस नसेल होत तर दोष आपल्याकडे येतो. आपण पूर्ण ताकदिने अथवा सर्वस्वी नाम घेत नसणार. आधी त्याचा शोध घ्यावा.
९.नाम घेताना सर्वात प्रथम त्याग करावा तो म्हणजे अभिमानाचा. हा अभिमान हे अस तण आहे जे मुख्य पिकाचा कधी नाश करील कळणार सुद्धा नाही. अभिमान त्यागावा म्हणजे इतका त्यागावा की मी नाम घेतो हा विचार देखील येता कामा नये, कारण अभिमान हा अत्यंत घातक आहे.
१०.नामात राहण्यासाठी कोणत्याही सबबीची आवश्यकता नाही. विनाअट आधी नाम सुरु करा.
याउप्पर अजुन काही गोष्टी पाहुया पुढील भागात.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/१०/२०१७
Comments
Post a Comment