नाम अवतार कलियुगी - ८
कालच्या विश्रांतिनंतर आज पुन्हा पुढे जाऊया.
मागील भागात आपण नाम हे एकाग्रतेचे मुख्य साधन आहे हे पाहिले. आता पुढे जाण्याआधी एका गोष्टीचा विचार करूया. या एकाग्रतेने साध्य काय करायचे आहे आणि याची गरज कितपत व का आहे.
असा विचार करूया ,की प्रभुने वा त्या ईश्वरी शक्तिने या भूतलावर वा समस्त ब्रम्हांडातील या ग्रहमालेतील पृथ्वी या ग्रहावर आपल्याला धाडले :
का, मानव म्हणूनच का, या देशात या प्रांतातच का , ज्या कुटुंबात पाठवले तिथेच त्या घरात का, लग्न झाले त्याच व्यक्तिबरोबर का, ज्या पद्धतीने संसार झालाय वा चालू आहे तो तसाच का.
या आणि अनेक प्रश्नांची गुंतागुंत मनात कधी ना कधीतरी येतेच. एक गोष्ट स्पष्ट आहे की हे जग एका विशिष्ट गणितावर आधारित आहे. ग्रह तारे , सूर्य चन्द्र एका विशिष्ट गतिनुसार चलन वलन करतात. तसच त्याना विशिष्ट कालमर्यादा आहेत, आपल्याला काही माहित असतील काही नसतील, पण असणार नककीच. ती शक्ति एक गणितज्ञ आहे हे नककी. कारण कधी अस घडलय का , आज सूर्य सकाळ ऐवजी दुपारी 12 ला उगवलाय, नाही. अशी शेकडो उदाहरण देता येतील. मुद्दा हाच सिद्ध होतो की, सर्व ठराविक गतीने चालू आहे. आणि श्रुष्टिचे सर्व नियम सर्वाना सारखेच लागू होतात.
मग मानव प्राण्याना वा सर्वच सजीव प्राण्याना सुद्धा हेच लागू असणार हे नककी. सर्व काही शास्त्रीय पद्धतीने नीट चालू आहे. म्हणजेच आपला जन्म , मृत्यु , जीवन यावर या नियमांचा प्रभाव असणारच नव्हे तो आहेच, आणि ते प्रत्येकाने अनुभवले आहे. म्हणून आपल्या जन्म,मृत्यु, कर्म, धर्म हे कोणत्यातरी विशिष्ट साखळीनुसारच होत असणार. बर त्याच एकमेव कारण हे कर्म हेच आहे. कस ते पहा
आपण विस्तव लावला त्यात हात घातला तर भाजेल हे नककी. यात दूसरी काही शक्यता दिसतेका. नाही ना.
आपण एखाद्या इमारतीवरुन उड़ी घेतली वा पोहता येत नसेल आणि पाण्यात उड़ी घेतली तर मृत्यु , निदान अपघात आणि इजा नक्कीच होईल.
वरील दोन उदाहरणातले परिणाम हे तात्काळ आणि त्वरित होणारे आहेत म्हणून त्याची लगेच सांगड घालता येते.
पण काही परिणाम हे दिसतात पण त्यांची सांगड वा संगति लगेच नाही लावता येत , पण तर्काने वा काही नियमाने लावता येते. जस :
आजारी पडण यात काही काळा पूर्वी आपण खाण्यात पिण्यात काही चुका केलेल्या असतात त्या लक्षात आल्यावर संगति जमते .
पण काही काही परिणाम असे असतात की ज्यांची सांगड वा संगति जुळवता येत नाही.
विचार करा , जरा विचार करा .
बघूया पुढील भागात. पण तोपर्यंत या आजच्या लेखाचा गाम्भीर्याने विचार करा. कदाचित पुढल्या लेखा आधीच काही उत्तर सापडतील काही जणाना .
भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/१०/२०१७
Comments
Post a Comment