ती वाट दूर जाते त्या निळ्या निळ्याच रंगी
उतरून जेथ आले मेघात क्षितिज रंगी
ते दाटले धुके अन मिळताच ती उसंत
मन मोकळे करावे होऊनिया निवांत
जमलेत आज सारे क्षण साठले सयिने
घेऊन हात हाती क्षण आज संगतीने
मन शांत शांत व्हावे पाहूनी रंग संग
डोळ्यात साठवावे ही वेळ हे तरंग
आता न जाग यावी स्वप्नातूनी सखे ग
मी , तूच तू असावे वाटे मना सखे ग
वाटे मना सखे ग इतुकेच बस सखे ग
प्रसन्न आठवले
०१/१०/२०१७
०८:३७
Comments
Post a Comment