ईश्वर चरणी नित्यप्रार्थना
ठेवून माथा तव चरणी
मागेन हे दान मी देवा
होऊ नको अवकृपा
ठेव हात मस्तकी देवा
राहो सदा श्रद्धा माझी
तुझिया वरी दयाळा
मी दुःखी न करावे कोणा
इतकेच दान दे मज देवा
मन बुद्धी अन हा देह
विवेकाने करो कर्म देवा
तुज नित्य स्मरून करणे
जमुदे, मज प्रपंच हा माझा
अभिमान अन् अहं हा
मानीन शत्रू सदासर्वदा
कल्पून तुज सखा मी
सांगेन सर्व भाव देवा
घडूदे नामस्मरण तुझेच
इतुके करवून घे देवा
मानून मज तुझा दास
चरणी राहूदे मज देवा
उन्ह पावसात राहूदे
हात माथ्यावरी देवा
स्मरणात तुझ्याच जगणे
स्मरणात श्वास श्वास जावा
ठेवून माथा तव चरणी
मागेन हे दान मी देवा
©® कवी : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment