Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८७ (विवाह सोहळा १५)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८७ (विवाहसोहळा १५) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
सावरलेल्या रुक्मिणीने कृष्णाला हळद लावण्याचे कार्य पूर्ण करताच ,सर्वांनी तिला नाव घेण्याचा आग्रह केला. रुक्मिणीने पत्नीधर्माला साजेसे नाव घेतले, जे ऐकून कृष्ण देवकीसह शुद्धमती आणि उपस्थित सर्व संतोष पावले. (कृष्णकृपेने हा उखाणा सुचला तो मांडत आहे, मूळ कथेत हा नाही याची नोंद असावी)

रूप न देखता ऐकली नाममहती ज्याची
तेंव्हापासूनच सर्वांगी झाले मी श्रीरंगाची
भाग्य थोर की पुण्याई माझी सतजन्मांची 
अर्धांगी झाले सर्वसाक्षीने त्या श्रीकृष्णांची

सर्व मंडप हर्षाने वाहवा करू लागला. अर्थात यानंतर कृष्णाने रुक्मिणीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार होता. परंतु सर्वजण त्याआधी, कृष्णाला आग्रह करू लागले की आता त्याने नाव घ्यावे. बऱ्याच आग्रहानंतर कृष्णाने रुक्मिणीकडे सुचक अर्थाने पाहिले, अर्थात तिच्या चेहऱ्यावर उत्कंठावर्धक  भाव पाहून कृष्णानेदेखील उखाणा घेतला. (हा उखाणासुद्धा काल्पनिक आहे)

नाम माझे ऐकून, कार्य माझे जाणून
संगम जी आहे बुद्धीसह सौन्दर्याचा  
धैर्याची सीमा केली स्वमन ओळखून 
रुक्मिणीस वरले मान राखून वचनाचा

या उखाण्यावर समस्त कौंडिण्यवासी शुद्धमती राजा भीमक अति प्रसन्न झाले आणि सर्वांनी कृष्ण रुक्मिणीचा जयजय कार केला.  या जल्लोषानंतर कृष्णाने आपल्या दणकट हातानी रुक्मिणीच्या नाजूक हाता पायांना चेहऱ्यावर हळद लावले. कृष्णहस्त स्पर्शाने रुक्मिणी मोहरून गेली आणि लाजेने बावरून तिने आपले डोळे मिटून घेतले. 

यानंतर कृष्णाला रुक्मिणीने नमस्कार करावा असे पुरोहित म्हणताच, रुक्मिणी कृष्णचरणी माथा टेकण्यास वाकली पण तिचं कपाळ चरणांवर पोचेचना. हा प्रकार अनेकवेळा घडला. याप्रकाराने निराश होत रुक्मिणी मूर्च्छित झाली. यावेळी उद्धव म्हणाला की , 

"हे कृष्णनाथा आपल्या चरणांशी आलेल्या भक्तांशी हा खेळ योग्य नव्हे. तिला चरणस्पर्श करू द्यावा."

या नंतर उद्धवाने रुक्मिणीला  खांद्याला धरून  उठवले आणि म्हणाला

" हे माते कृष्णचरणी माथा ठेवताना लज्जा अभिमान आणि षड्रिपु यांचा त्याग करून, मन निर्विकार व निर्विकल्प करून, वृत्ती सावधान करून मग माथा हरिचरणांवर ठेवा, तरच कपाळ हरिचरणी पोहोचते. आपण यामार्गे जावे आपला उद्धार होईल." 

उद्धवाने सांगितले त्यानुसार रुक्मिणीने हरिचरणी स्वतःला झोकून दिले आणि हरीचरणांना मिठी घातली. त्यासरशी अहमसोहम भावाचा विनाश झाला, अवघ्या जन्मांची स्मृती जागी झाली, जगाला विसरून , स्थळ काळाचेही भान न राहत रुक्मिणी ,हरिचरणी हरवून गेली. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२९/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...