Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७२

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

 जसे संदेश आणि लखोटे द्वारकेस गेले तसेच सेवक व लखोटे कौंडिण्यपुराला पोहोचले आणि नगरीत एकच हर्ष झाला, जो गगनाला भेदून गेला. कारण रुक्मिणीचं कार्य म्हणजे प्रत्येकाच्या जणू घरचं कार्य होतं. त्यामुळे घरोघरी जाण्याची आणि मंगलकार्याची तयारी सुरू झाली. लगबग करून सर्वांनी प्रस्थानाच्या स्थळी येऊन अनेक मंत्री राजमान्य अतिथी आणि बरेचसे प्रजाजन मुळमाधव या ठिकाणी कृष्ण रुक्मिणीच्या विवाहासाठी प्रस्थान करते झाले. 

विवाहाचे स्थळ जे मुळमाधव ग्राम होते त्याठिकाणी तर अभूतपूर्व उत्साह दिसत होता. यादवसैन्य आधीच तेथे असल्याकारणाने मोठा उत्सव आधीच सुरू झाला होता. राजा भीमकाने प्रत्यक्ष विश्वकर्म्याला पाचारण करून संपूर्ण मुळमाधव ग्रामी कृष्ण रुक्मिणीच्या विवाहासाठी भव्य मंडप व सजावट करण्याचं कार्य सुपूर्त केलं. 

परंतु हे करताना मंडपाकार असलेले मोठमोठे वृक्ष याना कोणतीही बाधा येणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची आज्ञा विश्वकर्म्यास देण्यास राजा भीमक विसरले नाहीत. विश्वकर्म्याने अर्थातच या आज्ञाप्रमाणे स्वर्गालाही लाजवेल अशी मंडप रचना आणि बाकीची सर्व  सजावट करून राजास पाचारण केले. 

राजानी अर्थातच पाहून आनंद प्रकट केला आणि राम कृष्ण या बंधूंना देखील पाहून घेण्यास आमंत्रित केले. दोन्ही बंधूंनी सर्व व्यवस्था देखून विशेष संतोष व्यक्त केला.  इथपर्यंत द्वारकेची सर्व मंडळी पोचली होती. त्यामुळे श्रीकृष्ण व श्रीबलीभद्र आपल्या आप्त परिवारासह तीर्थक्षेत्री स्नान व ततपश्चात देवदर्शन पूजाकार्य यासाठी गमन करते जाहले. 
स्नानानंतर मुळमाधव तीर्थक्षेत्री पुरोहितांसह श्रीबलराम यांनी यथाविधी प्रथम पूजन केले.  

त्यानंतर प्रत्यक्ष श्रीमाधवाने मुळमाधव रुपातील स्वरूपाचे पूजन केले. मोठा मनोहारी सोहळा होता. मूळमाधवरूप  निज रूपाचे पूजन पंचमहाभूत रुप देहातून करताना माधव स्वये साक्षी आणि तटस्थ या दोन्ही भूमिकांचा आनंद घेत असताना स्वतः कैलासेश्वर आणि ब्रम्हदेव पाहून आनंदित होत होते. 

या विवाह सोहळ्याचे आमंत्रणे कुरुवंशी , कैकेय यांसह सर्व राजामहाराजांना पाठवण्यात आली होती. ती सर्व व्यवस्था अर्थातच राम स्वतः ज्येष्ठ बंधू या नात्याने पहात होते. द्वारकेहून जशी मंडळी पोचली, तशीच कौंडिण्यपुराहून राणी शुद्धमतीसह मंत्रीगण आणि अनेक प्रजाजन मुळमाधव क्षेत्री पोचले. विवाहाची तयारी सुरू झाली. दूरदूरच्या राज्यातून राजेरजवाडे यांसह आमंत्रित मंडळी जमायला सुरवात झाली. लग्नाघरी अर्थात राजा भीमक उतरले होते त्या स्थानी न भूतो न भविष्यती असा उत्साह , जल्लोष, लगबग, तत्परता यांचा अनोखा दृष्यस्वरूप संगम देखून एका महत्तम कार्याची प्रचिती येऊ लागली. 

द्वारकेहुन आलेले वऱ्हाडी अमाप उत्साहात या सोहळ्याला आले होते. त्या स्थानी वाजंत्री , नगारे, ढोल , ताशे, सनई, या वाद्यांचा आवाज स्वर्ग पृथ्वी पाताळ यांना व्यापून उरला होता. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा विवाह असल्याकारणाने सुरवर , गंधर्व,यक्ष, किन्नर, नारद यांसह प्रत्यक्ष श्रीशिवशंभो देवी पर्वती सहवर्तमान आणि ब्रम्हलोकातून प्रत्यक्ष श्रीब्रह्मदेव देवी सरस्वतींसह उपस्थित जाहले होते. 

आता प्रतीक्षा मंगलविधींसह श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाची. या सोहळ्याला समस्त वाचकांना आमंत्रण देत आहे , उद्याच्या भागापासून प्रत्यक्ष विवाह सोहळा पार पडेपर्यंत. 


क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१४/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...