Skip to main content

जानकी पुनःवनवास २०

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २०

साक्षात सर्वसाक्षी परमेश्वर महाविष्णुचा अवतारधारी प्रभुंच्या लोचनातून सहस्त्रश्रुधारा येताना पाहून काळाला सुद्धा पुढे सरकण कठीण जात होत. युगातून एकदाच घडणारी ही घटना, हा दुर्मिळ योग, अनेकों जन्मांच पुण्य गाठीशी घेऊन आलेल्याना बघण्याचा सुयोग जुळून आला होता. सर्वत्राला व्यापुन दशांगुळे उरलेला परमात्मा सुद्धा मानवी देह धारण केल्यामुळे आज भावनावश झाला होता. मर्यादापुरुषोत्तमाला सुद्धा मर्यादा आहेत भावना नियंत्रणाच्या हेच सिद्ध होत होतं.

पुत्र रामाला यथोचित भेटून माता कौसल्या देवी सीतेला भेटली. पुन्हा एक हृद्य सोहळा सुखेनैव पार पडला. देवी जानकीने सुद्धा मातेचे सकुशल पुसले आणि मग माता लक्ष्मणाकड़े वळली आणि लक्ष्मणाने मातेला प्रणिपात केला. सर्व बंधुना आपलाच पुत्र मानणाऱ्या माता कौसल्येने लक्ष्मणास अलिंगन दिले आणि हनुमंताकडुन लक्ष्मणाच्या मूर्छित होण्याची मिळालेली वार्ता आठवून , मातेला अजुनच अश्रु आवरेना.

अचानक प्रभुंकडे पाहात मातेने प्रश्न केला,

" प्रत्यक्ष रामा तू बरोबर असताना सुद्धा त्या इंद्रजीताच अस्त्र माझ्या लक्ष्मणापर्यन्त पोचू कस शकल. "

या अकस्मात आलेल्या प्रश्नाने थोडे गोंधळलेले भगवन काही बोलणार इतक्यात माता सुमित्रा म्हणाली

" माझ्या रामाच्या रक्षणार्थ लक्ष्मण गेला होता. त्यांमुळे माझा राम सुरक्षित आहे याचच मला खुप कौतुक आहे. "

तरीही स्वतःला सावरत प्रभु वदते झाले

" या सर्वात मुख्य आणि अत्यंत स्तुतियोग्य भूमिका हनुमंताची आहे. त्याने जऱ उचित समयी संजीवनी आणली नसती तर "........... अस म्हणून प्रभुंच्या लोचनाला अश्रुन्ची धार लागली आणि स्वर सुद्धा सदगतित झाला.

आणि या सर्वात आपण हनुमंताच स्वागत करायला विसरलोय हे लक्षात येऊन माता कौसल्या प्रश्न करतात  की

" अरे या सर्व धामधुमित आपण हनुमंताला विसरून गेलोय"

आणि सर्वांच लक्ष हनुमान कुठे आहे हे शोधायला लागते. पवनसुत सर्व कोलाहलात एक कोपरा धरून तिथे उभ राहून फक्त निरीक्षण करत असतो. प्रभुनाही त्याचीच आठवण होते प्रभु बघतात की हनुमंताच्या लोचनातून सुद्धा अश्रुधारा येत असतात, साक्षात स्वामी श्रीराम याना अश्रुमग्न पाहुन हनुमंतसुद्धा अश्रुमय झाले होते. हा ह्रद्य सोहळा आपल्या नेत्रानी पाहून निरामय निर्विकल्प समाधिचा अनुभव करते होते. हनुमंताला या निश्चल स्थितीत पाहून प्रभु म्हणाले

" हनुमंता तू या सर्वाचा कर्ता धर्ता आणि तुही ......."

हनुमंताची निष्ठा पूर्ण प्रभु चरणी आहे.  पण आपल्या उत्तराकडे सर्वांच लक्ष आहे हे जाणून प्रभुंच्या कथनावर विनम्र भावाने , हात जोडून माता कौसल्येकड़े पहात म्हणतो

" मी फक्त प्रभु श्रीराम यांचा सेवक आहे आणि त्यांच्यां आज्ञेनुसार कार्य करतो . इतपत माझा सहभाग आहे, या सर्वात. याउप्पर काही श्रेय असेल तर ते माझ्या या जन्मी प्रभुभेटित आहे. मी अनेक जन्मांच्या प्रतिक्षेनंतर या चरणांना प्राप्त करू शकलोय, हे माझच अहोभाग्य आहे. आपण प्रत्यक्ष जन्मदात्या आहात. आपल्या चरणांची मृत्तिका मला माझ्या मस्तकी धारण करूद्या" अस म्हणून हनुमंत नमस्कारासाठी झुकतात.

यावर माता हनुमंताला हात जोडून प्रणाम करतात. ते पाहुन हनुमंत चिंताग्रस्त मुद्रेने म्हणतात

"माते आपण प्रणाम करून मला या पापाच धनी का करता आहात."

अस म्हणून हनुमंत माता कौसल्येच्या चरणावर मस्तक ठेवून , गुडघ्यात वाकून नमन करतात.

माता त्यानाही अलिंगन देऊन त्यांच्यां माथ्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात

' ज्याने माझ्या लक्ष्मणाच्या प्राणांच रक्षण केलय तो तर मला माझ्या प्राणाहूनही मला प्रिय आहे"

"म्हणजे प्रत्यक्ष्य रामाहुनही माते?, " लक्ष्मणाने त्वरित प्रश्न केला.

मातेला प्रश्नपेच टाकला हा आनंद लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर येण्याआधी माता कौसल्या उत्तर देते

" तुझेही प्राण मला रामाइतकेच प्रिय आहेत , म्हणजे तुझ्यापेक्षाही ना लक्ष्मणा "

उत्तरादाखल लक्ष्मण हात जोडून फक्त नमस्कार करतो आणि जमलेले समस्त एकाच हास्यकल्लोळात हरवून जातात.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...