हे प्रेम माझिया अन्तरिचे
हे प्रेम माझिया अन्तरिचे सांगू कसे तुज साजणा
बोलू मी कैसे हे तुला समजुन घे तू साजणा
हा भाव जो मज उमगला
तुज सांगणे का लागते
नजरेत माझ्या आर्तता
समजावण्या का लागते
हे वेड प्रेमाचे सख्या राधा तुझी मी मोहना
बोलू मी कैसे ........
गुलमोहराला जाग आली
कळलेच ना अजूनी तुला
गुलाब वेडा हा एकटा
फुलला न कळले रे तुला
तुजवीण जगणे ना साहवे जाण माझी भावना
बोलू मी कैसे ...........
© कवी : प्रसन्न आठवले
१६/०२/२०१८
१५:२४
Comments
Post a Comment