Skip to main content

जानकी पुनःवनवास १९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १९

सर्व रथ आता पूर्ण दृष्टिक्षेपात आले आणि इतका वेळ धरुन ठेवलेला मनांचा बांध कोणालाही आवरेना. आनंद , तो सुद्धा असा चौदा वर्षानि येणारा, अष्ठदिशानि, अष्टहातानी उधळून दिलेला काळाने,  आज समस्त अयोध्यावासियांवर. जणू अनेक युगांची तपश्चर्या फलास यावी आणि वरदान मिळाव, तद्वत आज भासत होत. सर्व रथ प्रासादासमोरिल भव्य वाहनकक्षात येऊन दाखल झाले मात्र , पुन्हा जयघोषात समस्त आकाश दुमदुमुन गेल. विद्दुल्लतेचा आवाज कमी भासावां असा निनाद, ललकाऱ्या , ढोल आदि चर्मवादये, यांचा जल्लोष पुन्हा एकदा झाला.

आणि त्या सुवर्णरथातुन स्वये प्रभु आणि देवी जानकी , भ्राता भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्यासह सर्व अतिथि उतरून प्रासादाकडे वाटचाल करू लागले.  प्रासादातील राजपरिवार पुढे पुढे येऊ लागला. आणि प्रचलित प्रथेप्रमाणे ताटातुट होऊन जऱ बारा वर्षानि पुन:भेट घडत असेल तर ती भेट प्रथम क्षीरपात्रामधे प्रतिमा  घडवून आणतात. त्यानुसार एका मोठ्या सुवर्णघंघाळात क्षीर भरून ते राजप्रासादाच्या प्रवेश द्वाराशी ठेवण्यात आल होत. त्यानन्तर माता कौसल्या आणि सुमित्रा याना डोळ्यांवर पट्टी बांधून त्या पात्राजवळ आंणण्यात आल, त्याआधी दुसऱ्या बाजूला पुत्र श्रीराम ,भार्या सीता आणि भ्राता लक्ष्मण याना बसवण्यात आल.

एक एक करून सर्वांच्या डोळ्यावरील पट्टया काढण्यात आल्या आणि त्या पात्रातील आपल्या मातेची आणि माता सुमित्रा यांच्या प्रतिमेला पाहुन , जणू अडथळा दूर केल्यावर बांध फुटावा तसा प्रभुंच्या नेत्राना अनंत धारा सुरु झाल्या. ह्याच दृष्याची प्रचिती दुसऱ्या बाजूला मातांच्या नेत्रातून येत होती. घंगाळातील दुधात अश्रून्चा अभिषेक सुरु होता. ह्या समयी त्यांच्यां बरोबरिने जमलेला सर्व जनसमुदायसुद्धा फक्त आनंदाच्या लाटांमधे मग्न झाला होता.

इकडे क्षीरपात्रात मुखदर्शनाचा विधी उरकल्यानन्तर मग प्रत्यक्ष भेट म्हणजे आनंदाचा मुक्त सोहळा. प्रभुनी आणि देवी जानकी यानी माता कौसल्या आणि सुमित्रा।यांच्या पाया पडून त्याना सादर वंदन केले आणि माता कौसल्येने पुत्रास अलिंगन देऊन मनसोक्त अश्रूनच्या धारानी प्रेमानंदे न्हाऊंन टाकले. या अभूतपूर्व दृश्याला साक्षी असलेले समस्त भूलोकासह सप्तलोकाचे सर्व आत्मे परमात्मे आज धन्य धन्य झाले.  यावतचंद्रदिवाकरौ असा हा सोहळा कोणी पाहिला नव्हता. हा सोहळा लोकानाही हेलावून टाकणारा होता.

शशी रवी सर्व स्वतः पातले देखण्याला
भुवरी नरदेही विष्णुअश्रू पाहण्याला
पवनसुत पाहतो दृश्यमाने अश्रुधारा
सुकर कर धरोनी मातृ नीज राघवाला

पूसते क़ाय रे जोडले मी पातकाला
म्हणून तू सोडले आपुल्या माऊलीला
कर न करी धराया कोणी होता न दूजा
तुज न पाहण्याचा दिन प्रारब्धी आला

या अश्याच शब्दातीत भावनेत माता कौसल्या आणि राघवरूप स्वतः एकमेकांना बघत होते. खरच या चौदा वर्ष ताटातुटीचा क़ाय अर्थ आणि प्रारब्ध ते हेच , याचाच प्रत्यय समस्त रघुकुलाला आला होता.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...