ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास २२
कैकयी एक माता, या सर्व सोहळयात आपल्या महालात बसून होती, शोकमग्न अवस्थेत , चौदा वर्षातील प्रत्येक क्षणाला आठवत, प्रत्येक प्रसंगाचा पुनःश्च विचार करत, स्वतःला , स्वतःच्या जगण्याला बोल लावत. जणू ही चौदा वर्ष नसून चौदा युगांचा काळ लोटला होता, एखाद्या दुःखद स्वप्नासारखा. स्वतः कैकयीला हे अजूनही अस्वीकार्य होत की ती स्वतः प्रत्यक्ष प्राणप्रिय रामाशी, तिच्या लाडक्या रामाशी इतकि निष्ठुर वागली होती, वागू शकली होती.
खरच जन्मात सुद्धा जीने कधी रामाचा दुस्वास केला नव्हता. रामाच्या राज्याभिषेकाला कधीही विरोध करण्याचा प्रश्नच वा विचारसुद्धा तिच्या मनाला कधीहि शिवला नव्हता आणि नसता, जऱ आणि जऱ........... हो जऱ ती दासी मंथरेच्या बोलण्याला बळी पडली नसती तर ............ नियतीने तिच्याशी घेतलेला एक सूड़ होता तो, कदाचित. पण आज चौदा वर्षानि या सर्वाचा विचार करून आणि पश्चाताप करून काही उपयोग नव्हताच. कारण जे घडल त्याला बदलण हे काळाला देखील शक्य नव्हत. आणि आज विचार करण्यात काही काही अर्थ नव्हता.
या सुरु झालेल्या सोहळयाने विचारांचे काहूर तिच्या डोक्यात माजले होते. यात अजून एका विचाराने भर घातली होती. किंबहुना जी भीति तिला गेली चौदा वर्ष डोक्याला त्रास देत होती , डोक्यातील प्रत्येक नस अन नस ज्या विचारानी गोठुन गेल्यासारखी झाली होती, तो विचार म्हणजे राम आल्यावर क़ाय करेल. जिथे प्रत्यक्ष पुत्र भरताने चौदा वर्ष आपल्याकडे पाठ फिरवली, तिथे राम, माझा राम ज्याला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, तो माझाच राम क़ाय म्हणेल. तो येईल तरी का बघायला, मला बघायला.
एक मन सांगतय की नाही राम तसा नाहीये तो नक्की येईल भेटायला , बघायला, बोलायला, विचारायला, आपल्या माता कैकयीला. पण ......... पण , दूसर मन सांगतय की नाही कसा येईल, दृष्टे,पापिणे ......ज्या प्रकारे तू त्या रामाच सर्वस्व .. हिसकावून घेतलस त्याच राज्य, आणि त्याच्या ......नव्हे सर्व पुत्रांच्या मस्तकावरून पित्याच छत्र हिरावून घेतलस ,.......... त्याना दुःखसागरात लोटलस. ते बघता राम कोणत्या कारणाने व तर्काने तुला क्षमा करेल, असा विचार शिवतो तरी कसा तुझ्या मनाला..........जी गोष्ट विधात्याने सुद्धा स्वप्नात कधी घडू दिली नसती रामाबाबत, तीच तू स्वतः घड़वलीस. स्वतःच्या कर्माने. ...इतक्या सर्वांच नुकसान केलस, ....... इतक्या सर्वांच्या मनाशी आणि भविष्याशी खेळलीस. आणि ............पापिणे वैरी सुद्धा करणार नाही ते केलस तू.....स्वतःच्या पतिच्या आणि ......आणि हो एका पित्याच्या शोकपूर्ण मृत्युला कारणीभूत ठरलीस. ख़र तर तुला जगण्याचा देखील अधिकार नाहीये. खरच पुत्र भरतसुद्ध रागाच्या भरात चौदा ...........हो चौदा वर्षानपुर्वी म्हणाला होता , जेंव्हा ......तो शेवटच बोलला माझ्याशी ..........तेंव्हा म्हणाला होता.............दृष्टे, हो स्वतःच्या जन्मदात्रीला हो मलाच म्हणाला होता , या काळजात रुतणारे तेच शब्द, जिव्हारी लागलेला खोलवर गेलेला घाव, अजून बोचतात ते शब्द तीरासारखे ............... दृष्टे तू..............तुला आई म्हणायची .................ला ......ज वाटते मला ...........................तुझ ............................ तोड़सुद्धा ...............पाहण्याची ..........इच्छा नाही तू आई नाहीस वैरिण ................ आहेस माझी साता जन्माची........मी ((अखंड वाहणाऱ्या अश्रुधारांमध्ये कैकयी बसलेली आहे आज चौदा वर्ष ) मी तुझ तोंड सुद्धा पाहु इच्छित नाही ............... आज पर्यन्त कधीही मला या जन्मदात्या आईला तोंडही दाखवल नाही माझ्या भरताने.
आणि हे शल्य कमी म्हणून आज माझा राम येईल. तो बोलेल का माझ्याशी, क़ाय करेल तो, कसा वागेल माझ्याशी, एकदाच घडाघडा बोलून मोकळा झाला तरीही चालेल मला. ऐकेन सारं मी. कैकयी यांच् मनस्थितित, विमनस्क अवस्थेत, अश्रूनच्या सोबतीने महालातील अन्तःपुरात बसलेली आहे पुढील शिक्षेची प्रतीक्षा करत, आजपर्यंत , चौदा वर्ष .
इकडे रामाची पावल माता कैकयीच्या महालात प्रवेश करतात आणि आत निरोप जातो की स्वयं श्रीराम आलेत. तो निरोप ऐकून कैकयी हतबुद्ध अवस्थेत उठते, परत सर्व जीव गेल्यासारखा खाली बसते आणि एका क्षणात अंगातील सर्व बळ पणाला लावून अन्तःपुरातून बाहेरच्या दिशेने धावत निघते, रामाकडे .
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment