चांदणे स्वरांचे मुग्ध चांदणे स्वरांचे उधळूनी तू देसी सुस्वर तुज स्वरांचा गंध केवळ मोहिनी करतो मनावर मुग्ध चांदणे ...... छेडिली जणू तू स्वरांची पुष्पमाला आम्रपर्णी रागदारीच्या सुरांनी कोवळाली आज किरणे लालिमा जणू प्राची वरती सूर्यबिंबाची तरंगे स्वर तुझे ऐकण्या येती स्वये ही सूर्यकिरणे भाट झाले मंजिरीचे अन उषेचे जुळले सूर मुग्ध चांदणे ...... जय जुई अन नागवंतीं बकुळ चाफा डोलतो मोहुनी मज ओढतो बघ जासवंती मंद्र स्वर तो पारूजातकही फुलोनि बाग जणू हि शोभतो मोगर्याची अत्तरे जणू गंधिली बघ या स्वरांवर मुग्ध चांदणे ........ © कवी : प्रसन्न आठवले ३१/१०/२०१७ ०९:४१