धुनी पेटली आहे आता दया करा अवधुता
प्राण फुंकले तयात नाथा भक्तवत्सला त्राता
मिटता डोळे दिसले सारे जग अवघे सामोरी
कुणी न आता उरला माझा स्वामी मज सावरी
तुम्ही जयाला अपुला म्हटले तारी तया निर्माता
धुनी पेटली आहे आता दया करा अवधुता
कृपा तुमची मग होई जेंव्हा, काही नको शिदोरी
बहु कष्टलो व्यर्थच जगलो, जाणीव केली जागी
आता तरी हा देह तरु दे अंत जवळी दिसता
धुनी पेटली आहे आता दया करा अवधुता
भोग संपले सारे शमले ऐसें होणे नाही स्वामी
तुम्हा विनवतो चुकलो मार्गा, लावा पार तयातुनी
अवघड आहे जगणे माझे तारा हो समर्था
धुनी पेटली आहे आता दया करा अवधुता
© कवी : प्रसन्न आठवले
२२/११/२०१८
१८:४९
Comments
Post a Comment