स्वामीसमर्था तव चरणी लागियले ध्यान
दयाघना नित्य येई या मुखी स्वामीनाम
स्वामी समर्था ......
तूचि निर्मिसी देहाला
तूचि देसी चैतन्याला
म्हणुनी अवघे जाहले निधान स्वामीनाम
स्वामी समर्था
नित्य जन्म येतो देही
नित्य मृत्यूमुखी जायी
स्वामी तुमच्या कृपेने तरावे हे अवघे जन्म
स्वामी समर्था
संकटे धाडसी परीक्षाही घेसी
आमुच्या श्रद्धेस बळ तूच देसी
इतुकेच व्हावे स्वामी मुखी येवो तव नाम
स्वामी समर्था
प्रसन्नचित्ते आठवले ते
चिंतामणीसूत लिहितो
कृपा व्हावी भक्तीस्तव स्वामी जागो अंतर्मन
स्वामी समर्था
© कवी : प्रसन्न आठवले
०१/१२/२०१८
Comments
Post a Comment