Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १५

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १५

श्रीकृष्णांनी स्मितवदन शून्यात दृष्टी लावली, काही क्षणच आणि उत्तर देण्यास आरंभ केला.

श्रीकृष्ण : असुर शक्ती या नेहमी तमोगुणाच्या प्रभावाखाली असतात. या तमोगुणात ऊर्जा प्रचंड असते. या ऊर्जा सुद्धा तामसी शक्तीच्या प्रभावात येतात. तमोगुण हा नेहमीच नकारात्मक असतो अस नाही. त्याचा वापर प्राणी कशा प्रकारे करतो यावर त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग अवलंबून असतो.

सहसा असुर वा दानवी मानसिकतेच्या व्यक्ती या प्रभावात येतात. त्या उर्जेतील शक्तीच्या सहाय्याने प्राणी अनेक गोष्टी करताना दिसतो, अनेक बाबतीत बलवान आहे असं वाटत. हा भास असतो. हा  तामसी प्रभावाचा फुगा फुटेपर्यंत आपल्या शक्तीचा हरप्रकारे प्रभाव दाखवणारच. हा असा प्रभाव किती काळ पर्यन्त राहील हे त्या शक्तीच्या आणि त्या प्राण्याच्या पूर्वपुण्याईवर अवलंबून आहे.

या तामसी शक्तीपूढे तप, पुण्य, सात्त्विकता या तेजाने उजळून निघालेला जीव उभा ठाकतो, त्यावेळी हा सामना सुरवातीस तामसच जिंकेल असाच भास होतो. किंवा तसच चित्र दिसायला लागतं. तसा तामसाचा प्रभाव अल्पजीवी असतो याच एक मुख्य कारण, या रागाच्या प्रभावाखालील व्यक्ती नेहमी चुकीची पावलं टाकते. चुकीच्या कर्मबंधात अडकलेली व्यक्ती , पूर्वपुण्याचा साठा संपेपर्यंत यशस्वी होईल असाच भास होतो.

पण जस कोणतंही कर्म आपलं फल दिल्याशिवाय शांत होत नाही, त्याचप्रमाणे याही बाबतीत होतं, नव्हे होणारच.  ही तामसी ऊर्जा जितक्या लवकर तप्त होते तशीच व  तितक्याच लवकर नष्ट होते. याविरुद्ध सात्विक ऊर्जेचा प्रभाव दिसायला मंद असतो,  चालायला सावकाश वाटतो, व प्रकाश मिणमिणता वाटत असला तरीही त्यामागे ईश्वरी अधिष्ठान असते. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व रुपात त्यामागे उभा असतो. त्यामुळे यामार्गाने जाणाऱ्याने निश्चय ढळू न देणे हे श्रेयस्कर असते. अन्यथा ज्या वाटेवर वा ज्या क्षणी ईश्वर सहाय्यासाठी सिद्ध असेल त्याक्षणी आपणच कष्ट करण्यात कसूर केली असेल, हे जाणवेल.

श्रीशंकर : सर्व काळी आणि सर्व वेळी ईश्वर कसा व कुठे कुठे पाठीशी उभा राहील व यासाठी प्राणीमात्राने काय करावे म्हणजे या सात्विक छायेच्या प्रभावात प्राणी सर्वकाळ राहील, हे कृपया विस्तृतपणे कथन करावे.

यावर श्रीहरी क्षणाचाही विचार न करता वदते झाले.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...