साद घालितो स्वामींना
अशक्य ते शक्य करा
आता कष्ट साहवेना
उपचार सुरू करा
तुम्ही लेकराला स्वामी
एकटाच सोडून दिधला
वाट चालणे कठीण
हात द्या हो आधाराला
तुम्ही माझे मायबाप
तुम्हीच हो सर्व सत्य
जाग आली हो उशिरा
जाणले हे जग मिथ्य
तुमच्याच आशेवर
आता सारे विसंबून
सारे सारे अंधारले
साथ द्या मी अवलंबून
आर्त आत हाक देतो
साद द्या हो प्राचितीने
उपकृत करा आता
स्मरतो मी प्रार्थनेने
विनवणी तुम्हा पायी
केली आता धीर जातो
उभा जन्म वाया गेला
शेवटाला मी स्मरतो
तरी तुंम्ही जगताची
केली आहे उठाठेव
मज पामराला आता
द्या हो लेणे ते अहेव
साक्ष या जन्मीची
उतराई होऊ द्यावे
मज तुमच्या कृपेचा
प्रसाद घेऊ द्यावे
माय आपुल्या लेकरा
कधी तरी सोडते का
तुची माय या हाकेला
साद एकदा देई का
साद एकदा देई का
© कवी : प्रसन्न आठवले
२२/११/२०१८
०८:०५
Comments
Post a Comment