Skip to main content

गीत रामा रघुनंदना विश्लेषण भाग ३

गीत रामा रघुनंदना याच विश्लेषण भाग ३

गीत : ग दि माडगूळकर
संगीत :  दत्ता डावजेकर
गायिका आशा भोसले
चित्रपट सुखाची सावली

रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल,
रामा रघुनंदना

मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन,
ही माझी साधना

पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
पुरेपणा जीवना......

शबरीला लागलेली आस आणि मातंग ऋषींचे शब्द हृदयात जपून ठेवलेली शबरी किती आर्ततेने वाट पहात आहे हे पहिल्या वाक्यात गदिमा लिहितात हे रामा हे राघूनंदना आज युगानुयुगे मी तुझी वाट पहात आहे. माझ्या या पर्णकुटीत , या आश्रमात तू कधी येशील  याची आज कित्येक वर्षे वाट पहात आहे.  तुझ्या एका भेटीसाठी , एका दृष्टीक्षेपासाठी आतुर ही शबरी , या शबरीची आर्तता , तिची भक्ती अजून तुझ्या हृदयी पोचली नाही का रे, हे प्रभू. यातील कधी रे या शब्दात ती आर्तता गदिमांनी सुयोग्य पद्धतीने मांडली आहे.

आपल्या स्वतःची , स्वतःच्या कमतरतांची, अवगुणांची आणि कर्माच्या अपूर्ततेची जाण असणारा कोणताही भक्त भगवंताकडे काही मागताना अर्थातच फक्त दर्शनाची आस ठेवून असतो. हे मागणं मागत असताना त्यांच्या सुप्त मनात आपण किती आणि कसे कमी आहोत ही भक्ती भगवंतापर्यंत पोचवायला. तरीही त्याने आपल्या भक्तीचा, भक्तीयुक्त प्रेमाचा स्वीकार करून आपल्याला एकदा दर्शन द्यावे, ही आस मनात असूनसुद्धा आपल्या कमतरता मांडताना शबरी , नकळत, आपली तुलना दोन श्रेष्ठतम व्यक्तिमत्वांशी करते.  जे योग्यच आहे., तिच्या जाणिवे आणि नेणिवे प्रमाणे.

या दोन वाक्यांची रचना करतानासुद्धा गदिमा घटनांचा क्रम विसरत नाहीत. आधी अहिल्योद्धार घडला आणि नन्तर सीता स्वयंवर. त्याच क्रमाने दोन्ही घटना मांडताना शबरीची आर्तता त्यात अनेक पटींनी अधोरेखित होईल याचीच काळजी गदिमांनी घेतली. हे श्रीरामा ज्या अहिल्येचा तू पदस्पर्शाने उद्धार केलास, जीचा जन्म तू सार्थ केलास, नव्हे जीच्या साठीच तुला महर्षी विश्वामित्र यांनी त्या मार्गाने नेले, कारण तेच जाणत होते की, या जगतात या पतित नारीचा उद्धारकर्ता
फक्त आणि फक्त तूच आहेस, नव्हे तुझ्याच पवित्र पावलांमध्ये ती पावनता आहे , ज्यायोगे हा उद्धार घडून आला.  त्या अहिल्येसम पावन होण्यास मी लायक नाही ह्याची जाण मला आहे.

ज्या लक्ष्मीरूप परमपवित्र अश्या जानकीमातेचा आपण धर्मपत्नी म्हणून स्वीकार केलात , त्या राजकुमारी देवी जानकी यांच्या इतकी योग्यता निश्चित माझ्या प्रारब्धात नाही किंबहुना माझ्या संचितात तितकी शक्ती नाही की मी या दोहोंच्या योग्यतेशी कशाही प्रकारे स्वतःची तुलना करू धजावेन हे असंभव आहे , हे रामा. मी एक दीन, अनाथ आणि साधी भोळी पण तुझ्या दर्शनाची आस लागलेली आणि त्या अर्थी भाववेडी व्याकुळ असलेली एक साधी भोळी भिल्लींण अगदीच असामान्य अशी शबरी नावाची सर्वसामान्याहून सुद्धा सर्वसामान्य अशी आहे.

मला अस वाटत जेंव्हा माणूस स्वतःला खूप हीन दीन समजू लागतो त्यावेळी खर तर त्याच्या अंतिम उद्देशाप्रत, विशेषतः अध्यात्मात, पोहोचण्यासाठी सुयोग्य मनःस्थिती तयार होते.  तरच आपल्यातील कमतरतांची, अवगुणांची पूर्ण जाणीव आपल्याला होते. नव्हे अत्युच्च , परमोच्च भक्तीचा तोच पाया आहे. स्वत्व विसरायला लावणारी खूप मोठी शक्ती त्या भावनेत असते. तीच भावना शबरीने मांडली आहे.

क्रमशः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...