मज चित्र उद्याचे दिसते ग
मज स्वप्न सख्याचे पडते ग
मज चित्र ......
बकुळ फुलांची घालून वेणी
उभी दारी मी मन त्या क्षणी
मन गाली खुदकन हसते ग
मज स्वप्न ........
सावरण्याचे जरी ठरवते
तरी बावरे मन घाबरते
उगाच तळमळ उरी का धडधडते
मज स्वप्न ........
वाट पाहण्या तयार नाही
क्षणही जाण्या तयार नाही
वाटे पाऊल जरी पानही पडते
मज स्वप्न ......
© कवी : प्रसन्न आठवले
१४/१०/२०१८
१८:४१
Comments
Post a Comment