ज्येष्ठ कवी, संगीतकार, गायक यशवंत देव यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं . त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी संगीत दिलेल्या काही गीतांचे शब्द वापरून
भातुकलीच्या खेळामधला यशवंत जाई जग सोडूनि
जगण्यावरती प्रेम करा रे सांगे संदेश संगीतामधुनी
शोधू नका रामेश्वर कोठे
चित्ती वसला असे तुझ्या
जीवनात ही घडी राहूदे
आनंदात सदाच तुझ्या
अशी पाखरे येती आणिक जाती स्मृती त्या ठेवूनि
भातुकलीच्या खेळामधला .....
अखेरचे हे येतील माझ्या
शब्द ओठी संगीत सदा
असेन मी वा नसेन मी
तरी सूर राहू दे मनी सदा
तुझे गीत हे गाण्यासाठी जन्म वेचला जगण्यामधुनी
भातुकलीच्या खेळामधला यशवंत जाई जग सोडूनि
© कवी : प्रसन्न आठवले
३०/१०/२०१८
Comments
Post a Comment