Skip to main content

नवरात्रात माळ दुसरी

नवरात्रात माळ दुसरी

द्वितीय माळरूपी
नमितो महालक्ष्मी
कोल्हासुर मारोनी
रक्षिले कोल्हापूर

आई त्रिकालज्ञानी
योगीयांची योगिनी
जगद्व्यापी जननी
अंबेरूप धारियेले

महिमा तव थोर
चाले अपरंपार
जगी सर्व चराचर
उरलीसे व्यापून

भक्तवत्सल वरदायि
ब्रीदा जागसी आई
लक्ष तुझे ठाई ठाई
भक्तालागी पाव

शुचिर्भूत होऊन
भावे तुजला नमुन
व्रतालागे समजून
करावे पुण्यार्थ

आई तू जाणतेस
दुःख कलियुगास
भोगणे प्रत्येकास
तरी सुलभ करिजे

माता प्रसन्न होई
हो चिंतामणी नेई
शब्द आठवले येई
कवनालागीं पूर्णत्व

ll इति श्रीमहालक्ष्मी प्रित्यर्थ द्वितीय माल: समर्पिता ll

© कवी : प्रसन्न आठवले
११/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...