नवरात्रात माळ तिसरी
आई जगन्माता धात्री
पूजीती तुज नवरात्री
अंबे चौसष्ट योगिनी
भजतात तुजलागी
तुझ्या दर्शनाची आस
शतजन्म शत श्वास
नवरात्रीच्या निमित्ते
पूजा आणि भजनाते
लावू दिवट्या मंडपी
सजवूया महिरपी
कौतुकाने ही आरती
गाती भक्त तुजप्रति
आई तिसरी ही माळ
गोड मानी प्रतिपाळ
उद्या तुझ्या भजनाला
जागर मांडीन पूजेला
यश द्यावे या भक्ताला
येई चवथ्या माळेला
प्रसन्न आम्हा होऊन
चिंतामणी देसी धन
आठवले ते मांडून
माळ तिसरी अर्पितो
ll इति श्रीयोगिनी कारणे तृतीय शब्दमाला अर्पणामस्तू ll
© कवी : प्रसन्न आठवले
१२/१०/२०१८
Comments
Post a Comment