Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१९

भोग आणि ईश्वर ६१९ 
  
इच्छा नसतानाही या मालिकेत दीर्घ खंड पडला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, मालिकेचा मागील शेवटचा लेख पुन्हा मांडत आहे, म्हणजे विषयाची सलगता राहील. त्यामुळे संध्याकाळी लेख क्रमांक ६२० मांडून, महाराज कृपेने, ही मालिका पुन्हा सुरू होईल, हा विश्वास धरुया. 

भोग या शब्दाचा विचार केला तर त्यातच आपल्याला आपल्या भोग आणि उपभोग याचं रहस्य सापडेल. दोन्ही शब्दात भोग हा शब्द आहेच. म्हणजे सुखात आणि दुःखात दोन्ही परिस्थितीत देह जे भोग भोगतो, त्याची संपूर्ण जबाबदारी वास्तविक स्वत:वर येते. कारण भोग भोगण यात भोगणारा तोच असतो, जो त्यांची इच्छा मनात धारण करतो. आता इथे प्रश्न निर्माण होतो की कोणी कधीतरी भोग अर्थात दुःख किंवा त्रास यांची कामना करेल का. 

प्रश्न योग्य आहे. कारण कोणीही कधीही आपल्याला उपभोग प्राप्त व्हावा यासाठीच कर्म करतो. कर्माचा सबंध देह, बुद्धी व मन यांच्याशी येतो. देहाने केलेलं कर्म बुद्धी व मन यांना मान्य असो वा नसो, पण देह मन व बुद्धी तिन्हींना भोगावे लागतात आणि उपभोग सुद्धा तिघांनाही प्राप्त होतात. आता मूळ प्रश्नाकडे येऊन, त्यांचं चिंतन करूया. कर्म हे मन बुद्धी वा देह यांपैकी एकाने वा संयुक्तपणे कोणीही केले तरी ते कर्म या संज्ञेत येतात. 

उदाहरणार्थ, मी रस्त्याने जाताना, मला एखाद्याचा राग आला म्हणून, त्या व्यक्तीला ठोकलं. ही कृती मनाला राग आला किंवा बुद्धीने उलटसुलट काहीही विचार केला म्हणून घडली. पण जर ती व्यक्ती माझ्याहून रागीट किंवा दणकट असेल तर, मनाच्या या कृतीचे परिणाम देहाला भोगावे लागणार. चारचौघात माझी अर्थात देहाने माझी जी ओळख आहे, त्याची मानहानी होणार ते वेगळंच. म्हणजे इथे मन व बुद्धी यांनी संयुक्तपणे केलेल्या कर्माचे भोग देहाला भोगावे लागतात. 

याऊलट एखादी कृती वा कर्म अजाणतेपणी मनाला ज्ञात नसताना किंवा मनात इच्छा नसताना घडलं, तरी जे परिणाम भोगरुपात समोर येतील ते मनाच्या इच्छेविरुद्ध देहाला भोगावे लागून, मनाला त्याचा अनिच्छेने स्वीकार करावा लागेल. किंवा देहासोबत मन त्या भोगमागे ओढलं जाईल. म्हणजे त्या भोगांचा मन अनिच्छेने स्वीकार करेल. आता या मधे कर्म काया वाचा बुद्धी व मन यापैकी कुणीही केलं तरीही, परिणाम इच्छित व अनपेक्षित असे दोन्हीही, या चौघांनाही भोगावे लागतात. 

जीवनाची हीच खरी अगतिकता आहे. पण यातसुद्धा, उपभोगाच्या काळात मन, बुद्धी व देह यांपैकी कोणीही, हे लादलेलं आहे की इच्छित आहे, याचा विचार करत नाही. पण भोग आले की मनुष्य सर्वसाधारणपणे, यावर. विचार करायला सुरुवात करतं. यावर पुढील चिंतन उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत आपला नामाचा नेम न चुकता सुरूच ठेवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...