Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ५

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ५

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥१॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥२॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्‌ ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥३॥

श्रीरामचंद्रप्रभूंचं ध्यान केल्यानन्तर त्यांच्या रूपाबद्दल सांगून झाल्यावर ऋषींवर प्रभूंच्या बाकीच्या गुणवर्णनाकडे वळतात. कोणत्याही व्यक्तित्वाची ओळख त्या व्यक्तीचं चरित्र सांगतं. इथे चरित्र हे त्या व्यक्तीच्या अंगचे गुणधर्म आणि त्याचा समाजाप्रती जनमानसाप्रती व्यवहार, जनसामान्यांच्या मनात त्यांची सत्यप्रतिमा, जनसामान्यांना वाटणारा त्यांचा आधार या सर्वांची गोळाबेरीज आहे वा असते किंवा असायला हवं.

कारण व्यक्तीगत चरित्र सर्वोत्तम असलेली व्यक्तीच समाजात जगतात सार्वजनिक जीवनात आदर्श , मूल्य, नीती यांचा परिपाठ स्थापित करू शकते. अश्या या मापनश्रेणीवर प्रत्यक्ष प्रभूरामचंद्रांच्या चरित्रविषयी सांगताना श्रीबुधकौशिक ऋषी या चरित्राच्या प्रभावाची कल्पना आपल्याला देताना म्हणतात की प्रभूंचं चरित्र किती काळ व्याप्त राहील, त्याचा प्रभाव किती काळ राहील हे सांगताना म्हणतात ह्या रघुनायकांच्या चरित्राचा विस्तार वा प्रभाव शतकोटी वर्ष पर्यंत राहील. 

याचा थोडा अर्थ समजून घेऊया. सर्व युगांची कालगणना एकत्र केली तर ती ४३,२०,००० वर्ष येईल. म्हणजे शत कोटी वर्ष म्हणजे किती युगं वा महायुगं या श्रीरामचारित्राचा प्रभाव राहील हे लक्षात येईल आणि हे ऋषींच्या मुखातून प्रत्यक्ष भगवान श्रीशंकरांचे वचनबोल आहेत. त्यामुळे त्याच्या सत्यतेची चिंता आपल्याला करण्याचं कारण नाही आणि ते सत्य असणारच. म्हणून जेंव्हा जेंव्हा त्या नामाच्या प्रभावाला आच लागण्याची वेळ येईल तेंव्हा तेंव्हा त्याच्या रक्षणार्थ स्वतः प्रभू कोणत्या ना कोणत्या रुपात येतील हा याचा गुह्यर्थ आहे.

या महान चरित्रात एक एक अक्षर हे इतकं पुण्यकारक, प्रभावी आहे की,  त्या एकेका अक्षराच्या वलयप्रभावाने साधी पातक नाही तर महापातकांचा नाश होतो. म्हणजेच महत्तम पापी जीवालासुद्धा तारण्याचं कार्य या नामप्रभावात आहे. कारण अक्षरं जोडून नाम आणि नाम जपता महापुण्य हे सहजसाध्य समीकरण आहे, असाच याचा मतितार्थ होतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वाल्या कोळी या लुटारूचं परिवर्तन महर्षी वाल्मीकिंमध्ये होणं हा या नामप्रभावाचा सर्वात मोठा दृष्टांत आहे, इतकं हे नाम पावन आहे, त्याचं वर्णन इतकं शुद्ध सात्विक आहे की, त्याच्या नुसत्या ऐकण्याने, म्हणजेच श्रवणभक्तीनेसुद्धा अलौकिक कार्य सिद्ध होतात.

हा प्रभाव ज्यांचा आहे त्यांचं आपण ध्यान केलं तर जी मूर्त डोळ्यासमोर येते तीचं वर्णन श्रीबुधकौशिक ऋषी पुढे करतात. निळ्या जळात उगवलेल्या सुंदर कमलाप्रमाणे अरेखीत अशी देहासंपदा असलेले श्यामवर्णी प्रभू ज्यांच्या लोचनांचा आकार एखाद्या कमलपत्राप्रमाणे आहे, ज्यांच्या मस्तकावरील जटा एखाद्या मुकुटाप्रमाणे आहेत किंवा ज्यांनी जटेचा मुकुट धारण केला आहे आणि जे जानकीदेवी व भ्राता लक्ष्मण या सहित विराजमान आहेत अश्या श्रीरामचंद्रप्रभूंचं आपण आता ध्यान करतो आहोत. 

ते प्रभुरामचंद्र जे अजन्मा आहेत म्हणजेच ज्यांचा जन्म आणि अंत नाही. असे ते श्रीरामप्रभु आहेत. सर्वसाक्षी तोच असतो जो एखादी गोष्ट घडताना पहात असतो,पाहू शकतो म्हणजेच ज्यांचं अस्तित्व त्या घडणाऱ्या गोष्टीहून भिन्न आहे. म्हणजेच जो त्या घडणाऱ्या गोष्टी आधी आणि नन्तरही अस्तित्वात आहे तोच साक्षी. या अर्थाने परम ईश्वर ज्याला या जगताचा साक्षी मानलय, तो या जगाच्या आधी म्हणून आदि आणि जगाच्या विनाशनन्तर म्हणजेच अंती असणार आहे तो अजन्मा आहे. त्याचा जन्म आणि अंत नाही.

असे हे अजन्मा प्रभू हाती खड्ग, तुण म्हणजेच तुणीर अर्थात बाण असलेला भाता आणि धनुष्य घेऊन बसलेले आहेत. सदैव शस्त्रसज्जता हे वीराचं द्योतक आहे. असे हे प्रभू जे आपल्या सहजलीलांनी राक्षसांचा, दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करून जगाला पापमुक्त, भयमुक्त करण्यासाठी या भूधरेवर अवतीर्ण झाले आहेत. अश्या प्रभूंच ध्यान मी  रामरक्षा मंत्र म्हणताना करत आहे, करणार आहे. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ५ .....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१४/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...