माझ्यातला मी
माझ्या अनुभवांनी मला लिहायला शिकवलं
अबोल होतो मी त्याने बोलयला शिकवलं
मनात अफाट वादळ होत
डोक्यात अनेक विचार होते
एकच नाही अनेक सूत्रे होती
जगण्याचं भान जपायला शिकवलं
माझ्या अनुभवांनी ......
मुळातच अनुभव शिकवतात
उरातली धडकी मार्ग दाखवतात
काळजातील धस्स जगवतात
या सर्वात जपून राहायला शिकवलं
माझ्या अनुभवांनी ......
चाहूल नव्हती अचाट कल्पनांची
माहिती नव्हती आतल्या वादळांची
वाचलीच नव्हती भाषा शब्दकळ्यांची
उमलून जगणं वाटायला शिकवलं
माझ्या अनुभवांनी ......
आता मीच अनुभवाना दाखवतो वाट
तेच थक्क होतात पाहून लेखन अफाट
शब्दांचीही मान आता असते ताठ
त्यांच्याच सुरात सूर मिसळायला शिकवलं
माझ्या अनुभवांनी ......
© कवी : प्रसन्न आठवले
०४/०७/२०१८
१७:२६
Comments
Post a Comment