मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद भाग ७
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि, इथपर्यंतचा प्रवासच खूप महत्वाचा आहे. कारण मन शांत करणं हेच खूप कष्टसाध्य आहे. त्याचवेळी या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या खालीलप्रमाणे.
१. बैठक हि अत्यंत आरामदायक असली पाहिजे. कारण
बसण्यात कष्ट होत असतील अश्या स्थितीत शरीराची
एकाग्रता त्यावर विभागली जाऊन मुख्य गोष्टीकडे
अथवा उद्देश्याकडे दुर्लक्ष होऊ शकत.
२. शरीराच्या कोणत्याही भागावर जोर पडेल अशी
बैठक स्थिती निवडण्यात येऊ नये. त्यामुळे उद्देश
साध्य होणार नाही.
३. हा अभ्यास सुरु केल्यानंतर सुरवातीला काही दिवस
वा काही काही वेळा झोप येण्याची शक्यता असते.
म्हणून सुरु करताना शरीर व मन ताजतवान असेल
अश्यावेळीच हा अभ्यास सुरु करावा. मुख्यत्वे
सकाळी उठल्यावर. कारण या वेळी शरीर पुरेश्या
निद्रेमुळे हलकं झालेलं असत. ज्यामुळे हा अभ्यास
करण्यास मदत होईल.
४. झोप येत आहे असं वाटल्यास सरळ काही वेळ पडून
आराम करावा मग हा अभ्यास सुरु करावा, जेणेकरून
शरीर पुन्हा ताजतवानं होऊन अभ्यास नीट करता
येईल.
५. हा एकाग्रतेचा अभ्यास असल्यामुळे शरीर व मन पूर्ण
तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही
प्रकारचा आजार असल्यास हे टाळावं. पण मानसिक
थकवा असेल तरी यातील एकाग्रते पर्यंत पोहोचण्याचा
अभ्यास झाला असेल तर त्याचा सराव करायला
हरकत नाही. कारण याचा उद्देशच मुळात ताण तणाव
या पासून मुक्ती हा आहे. म्हणून चित्त एकाग्र झाल्यास
मानसिक थकव्यापासून आराम मिळतो.
६. सुरवातीचा एकाग्रतेचा अभ्यास हा शरीर आणि मन
शांत , स्तब्ध, स्थिर, अविचल होईपर्यंत करत राहणं
गरजेचं आहे. काही जणांना कदाचित काही दिवसातच
हे साध्य होईल. काही जणांना काही आठवडे सुद्धा
लागू शकतात. म्हणून जमत नाही वा येत नाही असं
वाटून अर्धवट सोडायची गरज नाही. प्रयत्न करणं
गरजेचं आहे.
७. मुख्य मुद्दा कधी कधी हाती आलेली एकाग्रता चुकून
भंग पावते वा पुन्हा परत मन एकाग्र होण्यास
विलंब लागतो वा अन्य काही कारणाने चित्ताची
स्थिरता होऊ शकत नाही. याच महत्वाचं कारण
हा अभ्यास एक अभ्यास म्हणून न करता आपली
गरज म्हणून करत आहोत हे मनावर बिंबवलं पाहिजे.
या कामी सगळ्यात उपयोगी येणारी गोष्ट म्हणजे
इच्छा. दृढ इच्छेचा अभाव म्हणजेच इच्छा शक्ती च्या
अभावामुळे होऊ शकतं. त्यासाठी नामस्मरणाप्रमाणे
हि गोष्ट वा हा मुद्दा मनावर कोरला पाहिजे कि मला
चित्त एकाग्र केलं पाहिजे. मला या योग साधावयाचा
आहे. आधी हा संकल्प मनात रुजवून त्यामागे मनाची
आणि मनाच्या मागे इच्छेची शक्ती लावणं महत्वाचं
आहे.
८. सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि, हे सहज साध्य आहे
आणि आपल्याला जमणार या विश्वास आणि श्रद्धा या
जोरावर नियमित शरीराला आणि मनाला कोणतेही
कष्ट न देता, पण दृढ संकल्पाने सुरवात करून इच्छित
लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. यासाठी कितीही विलंब
लागला तरी चालेल.
अजून काही मुद्दे पुढील भागात.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०३/०७/२०१८
१५.५२
Comments
Post a Comment