ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास १०१ हे लक्ष्मणा एवढे सांगून आणि आपल्या पुत्र व परिवाराचे सांत्वन करून राजा नृग तयार करण्यात आलेल्या गुहेत शाप भोगण्यासाठी प्रस्थान करता झाला. या कथनानंतर लक्ष्मणा तुला अजून काही ऐकायचे असेल तर अशीच एक रोचक कथा मी तुला सांगू इच्छितो. " यावर लक्ष्मण त्वरित उत्तर देता झाला. "हे नरश्रेष्ठ राजा आता आपण ऐकवली ती कथा अद्भुत आहेच पण राजधर्माचे पालन राजाने न केल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण देखील आहे. म्हणून हे राजन मला अश्या धर्मोपदेशक कथा ऐकायला नक्की रुची येईल. किंबहुना अश्याच धर्मपरायण संस्कारी कथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही. त्यामुळे अजून एखादी कथा आपण जर सांगणार असाल तर मला ती ऐकायला नक्कीच आवडेल. " लक्ष्मणाचे हे बोल ऐकल्यावर प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले. "हे लक्ष्मणा आपलेच पूर्वज महान राजा ईक्षवाक, ज्यांच्या नावाने हा वंश सुरु आहे त्यांचा बारावा पुत्र ज्याचे नाव राजा निमी होते ते अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. याच राजा निमी यांनी महान तपस्वी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ , देवलोकासम , किंबहुना त्याहून अद्भुत अश...