पहिला पाऊस आणि प्रेम
मनाशी बांधले मन
जुळला हा प्रेमबंध
जसा मेघांचा खेळ
अन अवनीचा गंध
नभी जमले मेघ
आभाळ ये भरून
तितकेच माझ्याही
भरले प्रेमात मन
पान पान जागे होई
मेघ जमता आकाशी
तुझ्या एका नजरेने
घायाळ रे मी मानसी
तुझ्या ओढीने आता
मन न लागते कशात
चोहीकडे दिसतोस
गंध तुझाच श्वासात
आली वीज कडाडून
आता भिजेल धरणी
साक्ष तुझ्या प्रेमाची
मन पाहिलं नयनी
आता व्हावे हे आकाश
मोकळे मोकळे सारे
लागले तसेच सख्या
वाटेकडे डोळे माझे
कवी : प्रसन्न आठवले
२८/०५/२०२०
०७:५८
Comments
Post a Comment