तू धुंदी
डोळ्यातील शब्दांमधुनी
नजरेच्या भाषेमधुनी
तू तीर सोडते जे जे
लागती थेट ते येथे।।
नजरेच्या भाषेमधुनी
तू तीर सोडते जे जे
लागती थेट ते येथे।।
ते पाऊल पड़ते जेथे
एक मधाळ धुंदी तेथे
पायातील पैंजण रुमझुम
मनी उठती नादस्वरे ते ।।
एक मधाळ धुंदी तेथे
पायातील पैंजण रुमझुम
मनी उठती नादस्वरे ते ।।
तू फिरसी ज्या ज्या वाटा
पाकळ्या सुगन्धित करसी
पापण्या उघडसी मीटसी
जणू दिवस रात्र तू करसी।।
पाकळ्या सुगन्धित करसी
पापण्या उघडसी मीटसी
जणू दिवस रात्र तू करसी।।
येउनी समीप तू बसता
अप्सराच् मी जणू पाही
पापण्या जरा घे मिटूनी
अप्सराच् मी जणू पाही
पापण्या जरा घे मिटूनी
दिसूदे मज थोड़े काही ।।
हातात घालूनी हात
गाऊया धूंद स्वरात
प्रीतीचे गीत मनातील
हृदयातून एक सूरात ।।
हृदयातून .......
गाऊया धूंद स्वरात
प्रीतीचे गीत मनातील
हृदयातून एक सूरात ।।
हृदयातून .......
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment