Skip to main content

कॉलेज प्रेम (कादंबरी)



कॉलेज प्रेम 
(कादंबरी)



प्रसाद कॉलेज मधून निघताना तनूला म्हणतो की, उदया 10 30 नंतर सकाळी मी तुझ्या घरी येतो, आपण बाइक वरुन लॉन्ग राइडला जाऊया. तुला पण आवड़तच ना.
तनू : मी येणार नाही.  मला आवडत हे तुला कोणी सांगितल.
प्रस् : जस काही माहितच नाही कोणाला.  तूच म्हणालीस, एकदा, 
तुझ्या मैत्रिणीना की बाइक वर बसण्यासाठी तू काहीही करशील,  बरोबर 
तनू : तरी पण  मी नाही येणार
प्रस् : अग का पण उद्या घरचे कोणी नाहीत ना, मग माझ काही चुकले का ते  तरी सांग

तनू : चूका कर स्वतःच आणि नंतर विचार मलाच ,  मी चालले (तनू लगेच जायला निघते आणि प्रस् तिच्या मागे जातच असतो तेवढ्यात कॉलेज मधील शालिनी प्रस् ला आडवते) 

शा : कसा आहेस प्रस्,  या टी शर्ट मधे खूप मस्तच दिसतोस.  तसा तू आहेसच् छान पण अजून हैंडसम दिसतोस
प्रस् : अग मी ज़रा घाईत आहे, तेंव्हा  नंतर बोलुया बाय
शालिनीला प्रसशी बोलताना पाहून तनू  आणखीनच  चिड़ते आणि रागाने निघून जाते
प्रस् दुसऱ्या दिवशी 10 30 नंतर
तनूच्या घराच्  दार वाजवतो तनू दार उघडते आणि तेवढयाच् जोरात परत लावून घेते प्रस् काही बोलणार इतक्यात दार पुन्हा उघडत………  
तनू : मी आपल्याला ओळखत नाही.  हैंडसम आहेस ना मग कोणी भेटली  नाही का बाइक वर बसायला
प्रस् : अरे बापरे अग खरच माझ्या काही मनात सुद्धा नाही तस काही
तनु : तर तर छान गुलुगुलु गप्पा झाडत होतास
प्रस् : कोण ती शालू
तनु :  बघ लाडाच् नाव पण ठरल आहे
प्रस् : अग तिला सगळेच या नावानेच हाक मारतात आणि ती म्हणाली होती एकदा मला शालूच म्हण 

तनू :  बघ इतक अंडरस्टैंडिंग आहे तुमच्यात मग माझीच अडचण कशाला
प्रस् : अग तुझी अडचण नाहिये आमच्यात.   अरे  यार परत परत चुका का करतोयस प्रस्

तनू : चुका वगैरे काही नाही सत्य बाहेर येतय येऊ देत एकदाच काय तेप्रस् : तनू अस काहीही नाहिये तुझ्या मनाचेे खेळ आहेत
तनू : म्हणजे मी वेडी अस म्हणायचय का म्हण तस मग तर  तुला काहीच हरकत नाही तुझ्या शालू बरोबर जायला
प्रस्: पण मला आत तर घे बाहेर सगळ्यांना कळेल आपल  
तनू : आपल काय
प्रस् : हे जे काही भांडण चाललय ते ( तेवढ्यात जीभ चावतो)

तनू : अच्छा म्हणजे आता मी भांडकूदळ झाले.   ती नटवी आता परी आणि मी भांडखोर
प्रस् : तू आधी आत येऊ देत तर 

तनू : बर ये आत
प्रस् : लवकर घेतलस ग बाई

तनू : मला चार लोक प्रश्न विचारतील म्हणून  घेतलय
प्रस् : बर आता बोलू मी चालेल

तनू : म्हणजे इतका वेळ काय मी एकटीच बोलत होते का
प्रस् मख्हपणे उभा राहतो
तनूला मनात हसायला येत असत त्याला अस बघून तरी पण ,मुद्दाम 
तनू : बोला आता (गालातल्या गालात हसते )
प्रस् : पण तू सकाळी कॉलेज मधे का रागावाली होतीस

तनू :तिच्या बरोबर गुलू गुलू का बोलत होतास ते सांग
प्रस् : पण तू तर त्या आधीच तू रागावून निघाली होतीस

तनू : त्या आधी  तू त्या नकटीचा हात हातात धरलास ते सांग
प्रस् : आता तीनेच शेक हैण्ड केला मी फक्त रिस्पांस दिला तिला

तनू : तू त्यावर तिला काय म्हणालास ते आठव आधी
प्रस् : काय काहीच नाही म्हणजे आठवत नाहिये

तनू : मी सांगते.  ती तुला म्हणाली की काय छान दिस्तोयस आज साद त्यावर तू फक्त थैंक्स म्हणू शकला असतास ते सोडून त्या नकटीला म्हणालास यू टू आर ब्यूटीफुल,  तेहि माझ्या समोर.  मग माझ्या मागे रेड रोज वाटत असशील
प्रस् : आता तू उगाच ताणतेस अस नाही वाटत अग मी मुलींना आवडतो त्याला मी काय करू

तनू : मी सांगते,  त्यातलीच एखादी बघ
प्रस् : मग मी काय कराव अशी तुझी अपेक्षा आहे

तनू : मी तूझ्या कडून  अपेक्षा ठेवणारी कोण तूझ तू ठरव
प्रस् : आता नविन मुद्दे काढून वाद वाढवू नकोस बाई

तनू : बर मी वाद घालते
प्रस : तस नाही पण … 
तनू  : मी वाद घालते बर तू 9 30 पर्यन्त येणार होतास.  का लेट आलास
प्रस् : काल तूच म्हणालीस 10 30 पर्यन्त  ये

तनू  : तयार होतास तर यायचस का भेटली  कोणी गोपिका
प्रस् : अग नाही निघणार होतो एवढ़यात शालूचा फ़ोन आला ( प्रस् पटकन जीभ चावतो ) 

तनू  : बघ मी म्हटल नव्हतं की,  ती बरोबर माझ्या आधी असतेच् तुझ्या आयुष्यात.  मग तिच्याशी एक तास गप्पा.  संसारच प्लानिंग केल असेल तूझ्या बरोबर
प्रस् : ती इकोनॉमिक्सचे   तिचे डाउट्स विचारत होती

तनू  : प्रस  पचेल अस खोट बोलाव माणसान.  ती सायन्स ला आहे माझ्या बरोबर आणि तू कॉमर्स तुझ्याशी  बोलण्याचा बाहाणा शोधला तिने प्रस् तू खुप भोळा आहेस
प्रस् : हो आपल्या दोघानाही ओळखणारे बरेच जण अस म्हणाले मला (एवढं बोलून प्रस् जोरात हसतो आणि पटकन त्याच्या लक्षात येत आपण परत एक चूक केलि आणि तो जीभ चावतो आणि लगेच सावरुन म्हणतो ) सॉरी सॉरी मी चेष्टा करत होतो ( पण भात्यातून बाण सुटलेला असतो )
तनू  : बरोबर बोलतोस तू चूकच केलिस तू माझ्या जाळ्यात अडकणयाची.  पण तुझी शालू  आल्ये ना सुटका करायला
प्रस् :  
तनू  ....(तेवढ्यात त्याला अडवत  तनू  म्हणते)
तनू  : तू  तनू  नको म्हणूस मला
प्रस् : 
तनू  मी शेवटच विचारतोय तू ... तनू  : अच्छा म्हणजे शेवटच प्लानिंग पण  करून आलायस 
तेवढ्यात प्रस् रागावून बाल्कनीत जातो आणि बघतो तर तनूचे आई बाबा खाली येतच असतात
प्रस् : आता मी मेलो मुलगी कमी होती म्हणून बाप पण हजर हजेरी घ्यायला
तनु : माझ्या वडीलाना बाप म्हणतोस
प्रस् : माझे आई तुझे तीर्थरूप आणि पूज्य माताजी येत आहेत रस्त्यावर क्रॉस करून  बिल्डिंग मधे
तनु : बापरे आता एक काम कर ही गच्चीची चावी घे वर थांब आणि ते घरात आले की जा पळ लवकर चावी उद्या दे आणि माझा  राग अजून गेला नाहिये लक्षात ठेव  
प्रस् कसातरी सटकला तिथून आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज गेट बाहेर तनूची वाट बघत उभा होता पण आज तनूने देखील मुद्दाम उशीर करायच ठरवल होत. बराच वेळ असाच गेला त्याला उभा पाहुन तिथून जाणारी शालिनी अचानक थांबली आणि प्रसादला म्हणाली अरे कोणाची वाट बघतोयस प्रस् तिला उत्तर देणार एवढ्यात तनू  नेमकी बघते आणि फणकाय्राने गेट मधून आत निघुन जाते . ते पाहुन शालू त्याला म्हणते जा लवकर नाहीतर तुझी हिरॉइन जाईल हातातून अणि मग नविन हिरॉइन शोधायची वेळ येईल प्रस् तिला हात  जोडून म्हणतो,  हे माझे आई तू का दर वेळी मधे येतेस नमक याच वेळी तनू  मान वळवून पहाते आणि उलट पावली स्कूटी जवळ येवून जायला निघते प्रस् चपळाई करून  बाइक काढतो तिच्या मागे जावून तिला घरी गाठतो तनू रागाने  दार उघडून लगेच लावून घेणार इतक्यात प्रस् तिच्या मागून आत शिरतो. तनु रागारागाने  बॅग सोफ्यावर टाकते आणि आत जायला निघते प्रस् तिचा हात धरून  तिला थांबवतो  
प्रस् : आता तुझीच वाट बघत उभा होतो आणि नेमकी शालू i mean शालिनि भेटली
तनू  : तू तिला शा म्हटलस तरी मला काहीच फरक पडणार नाही आता.  काय छान जोड़ा आहे तुमचा कशी बरोबर मी नेमक्या वेळेसच तुला ती भेटते 
प्रस् : तेच तिला विचारत होतो मी 
तनू  : हो का हात  जोडून ते पण. माझ्या कधी नाही अश्या पाया पडलास 
प्रस् : अग तुझ्या पूढेसूद्धा सतत हात जोडूनच असतो मी ( एवढं बोलून प्रस् जीभ चावतो ) 
तनू  : सुद्धा म्हणजे अश्या रोज किती जणीना हात जोडतोस ते तरी कळू देत 
प्रस् : अग चुकून शब्द निघाला
तनू  : हो का मग चूकुनच माझ्या प्रेमात पडला असशील 
प्रस् : नाही ते चुकून नाही तुला पहिल्यांदा पाहिल आणि काळीज हरवून बसलो (इथे प्रसने हात जोडलेले असतात) 
तनू  : हेच तिला पण सांगत होतास का असेच हात जोडून. .......

प्रस् : अग नाही तिला मी हेच वचारत होतो की माझे आई .....       
तनू  : हेच तू काल मला पण म्हणालास 
प्रस् : काय 
तनू : माझे आई , म्हणजे तिची सुद्धा समजूतच काढत होतास तर 
प्रस् : अग  माझे आई .....
तनू : बघ काय म्हणाले मी 
प्रस् : तुला कस समजावू  तेच कळत नाहिये 
तनू : आता समजावून सांगण्याचा पण कंटाळा आला असेल तेच तर म्हणतये मी म्हणूनच मी तुला सोडवते यातून.  अरे खरच तू तीच्याशीच् मैत्री कर खुप छान आहे तुझ्या पुढे सारखी गोंडा घोळेल तुला तिच्याशी मोकळेपणी चर्चा संवाद सर्व काही करता येईल मी खरच सोडवते तुला 
प्रस् : तुला खरच मनापासून वाटतंय की मी तुला टाळतोय अस
तनू : बघ जेंव्हा जेंव्हा मी येते तुला भेटण्यासाठी तेंव्हा तेंव्हा ती असतेच् तुझ्या बरोबर आणि तू तिला टाळू शकतोस काय. बरोबर ना .  कारण आपली दोघांची मैत्री जगाला माहित आहे हे तर तू तिला निश्चितच सांगू शकतोस.  
प्रस् : अग बाई  तिला हेच सांगत होतो हात जोडून का रोज मधे येतेस आमच्या 
तनू : (लाजत ) नक्की 
प्रस् : हो खरच 
तनू : मला माहीत होत आणि विश्वास आहे तुझ्यावर पण परीक्षा घेण्यात आणि तुला त्रास देण्यात मला मज़्ज़ा येते 
प्रस् :  व्वा आणि माझी किती हालत होते तुला पटवताना 
तनू : हो आणि तू जसा कही भोळा सांबच जणू तू पण मला त्रास देतोस छळतोस मूद्दामून चिडवून 
प्रस् : ते म्हणजे मला आवडत तुला चिडलेल बघायला 
तनू : शहाणा आहेस 
प्रस् : आता माझ्या  बाइक वरुन तुला लॉन्ग ड्राइव ला न्यायचय तू येशील ना 
तनू: हो पण आपण शहरा बाहेर आपापल्या गाड्यानी जावू आणि मग तिथून तुझ्या बाइक वरुन लॉन्ग ड्राइव ओके खुश 
प्रस् : खुश म्हणजे प्रत्यक्षात  होईल तेंव्हा पण सध्या नुसत्या कल्पनेनेच बर वाटतंय. 


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...