आई
आई आहेस तू म्हणजेच सर्व काही आहेस
मधाची वाटी आहेस, दुधावरची साय आहेस ।।
काटे बाजूला करणारा माळी आहेस
अलगद करवंद हातात देणारी जाळी आहेस ।।
अनेक खस्ता खाल्यास तरी उभी आहेस
कधीही न मावळणारा सूर्य होऊन नभी आहेस ।।
गरजेला सिंहिण तर लेकरांसाठी शेळी आहेस
आणि वेळ पडल्यास स्वतः जळणारी लाकडाचि मोळि आहेस
देवाला सुद्धा वाटतोय हेवा अशी तू शक्ति आहेस
पण तूझ्या मुलांसाठी सर्व सुखांची विरक्ति आहेस ।।

Comments
Post a Comment