Skip to main content

कृष्ण विरहिणी



कृष्ण विरहिणी

घेउनिया  मजुळ स्वर
आली ही उषा असे
देण्या बघ  आधारच
आला हा दिनकर रे ।।१।।
वर्षा स्वर मुरलीचि
गोकुळात घनश्याम
खग होऊन कृष्णसखा
लेउनिया प्रेमपीसे ।।२।।
पटपट अन  लगबग हे
रवरते मेघ नभी
राधानाचे बघुन
जलधारा बावरुंन ।।३।।
पाहुनी हे जे समोर
करी राधा अर्चना
नाचुनिया कृष्णसखी
इकडूनि तिकडे फिरून।।४।।
कड़कड़ते बिजलीसम
सुरु झाल्या  ऋतु धारा
नाभि त्यातच जलधारा
आक्रंदनी हो अधीर  ।।५।।

 नक्षत्रांचीच जणू
 राणी  ही स्वाति सुरु
गडगड़ती मेघ हेच
करती जणू सुर वर्षा।।६।।
जणू ऋतुराणी  करी प्रतिभा
पाहुनी त्या कृष्ण सख्या
शर्मिलिया हो तनया
ऐश्या या प्रेमातच ।।७।।
डुंबूनिया   आकंठ जणू
आपुल्या त्या प्रेमाताच
नच ठावे जग दोघा 
जाहले जणू  अधीर ।।८।।
मोहुनिया त्या स्वरात 
आसमंत डोलतसे 
स्वर येता ते कुठून 
गोळूळात मुरलीचे ।।९।।
घेउनिया तिज कवेत 
बेहोशीत जाय कृष्ण
राधा राणी अधीर 
मुरली स्वर तव कृष्णा ।।१०।।
घेउदेत पान्हा तो 
प्रेमाचा तव कान्हा 
भिजवोनी टाक तिज 
स्वर वर्षावाने तव
स्वर वर्षावाने तव 
स्वर वर्षाने तव ।। ११।।
कवी : मेदिनी 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...