मैत्रीण आणि बायको
मैत्रीण निश्चितच खास असते
पण बायको मात्र श्वास असते।।
मैत्रीत कमी जास्त उण अधिक चालत
पण बायकोला फक्त प्रेमच बास असत ।।
मैत्रीण म्हणजे अत्तराचा घमघमाट असते
पण बायको मात्र मंद उदबत्तीचा सुवास असते ।।
मैत्रीण भेटली नाही तर हुरहूर लागते
पण बायकोला फक्त आणि फक्त माझीच आस असते ।।
मैत्रीण कधी कधी एक भास असते
पण बायको मात्र संपूर्ण विश्वास असते ।।
माझ्या मते मैत्रीण ही आरतीतला कापूर असते
तर बायको निरांजनातील तुपाची वात असते ।।
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment