रुसवा
तू रुसलीस अन् ऋतु फिरले ग
हिरवी पाने करपुन गेली
वेली वरची फुले गळाली
दाह जणू ग्रीष्माचा आला ||
तू ....
निळ्या नभाना रक्तवर्ण जणू
नवरस झाले शुष्कपर्ण जणू
सुन्दरताहि कुरुपचि भासे
बर्फ भासतो तप्त उदक जणू ||
तू...
चारि दिशाना ऊष्मा ग्रासत
कणाकणातून लाव्हा उकळत
सूर्यही झाला नऊपट दाहक
आग ओकतो वसुंधरेवर ||
तू ...
आता तरी तो क्रोध सोड तू
माझी मज ना काही चिंता
चराचराचि सुटका करण्या
सोडशील का राग तू आता ||
तू ...
हिरवी पाने करपुन गेली
वेली वरची फुले गळाली
दाह जणू ग्रीष्माचा आला ||
तू ....
निळ्या नभाना रक्तवर्ण जणू
नवरस झाले शुष्कपर्ण जणू
सुन्दरताहि कुरुपचि भासे
बर्फ भासतो तप्त उदक जणू ||
तू...
चारि दिशाना ऊष्मा ग्रासत
कणाकणातून लाव्हा उकळत
सूर्यही झाला नऊपट दाहक
आग ओकतो वसुंधरेवर ||
तू ...
आता तरी तो क्रोध सोड तू
माझी मज ना काही चिंता
चराचराचि सुटका करण्या
सोडशील का राग तू आता ||
तू ...
कवी : मेदिनी
Comments
Post a Comment