ओळख
( एक विनोदी प्रकार )
अचानक दार वाजत आणि मीनल दार उघडायला जाते दरवाजात एक तरुण मुलगा उभा. मीनल: yes कोण आपण आणि कोण हवय.
प्रसाद: ताई मी प्रस्, तनुच्या i mean, तनुजाच्या बरोबर आहे, तिच्याच कॉलेज मध्ये
मीनल: बर मग.
प्रसाद: नाही ती आहे का म्हणजे असेल ना घरी. तिला माहित आहे मी येणार ते.
मीनल: नाही ते नंतर बघू. पण तू प्रस् म्हणजे पूर्ण नाव सांगशील तर खर.
प्रसाद: oh sorry नाही म्हणजे ते कॉलेज मध्ये नीक नेम आहे माझ. प्रसाद साठे पूर्ण नाव आहे माझ आणि सॉरी परत.
मीनल: अरे असुदेत होत अस ठीक आहे.
प्रसाद: बर तनुश्री , i mean तेजश्री, अरे सॉरी तनुजा असेल तर बोलावा ना म्हणजे बोलावता का अस विचारायच होत
मीनल: म्हणजे असा किती मुलींच्या घरी जातोस तू.
प्रसाद : नाही अहो चुकून ती नाव निघालो घाबरून , शपथ
मीनल : (हसू निर्धाराने लपवत) पण तिच्या बोलाण्यात कधी प्रसाद ऐकले नाहिये.
प्रसाद: पण प्रस् ऐकल असेल नक्कीचमीनल: infact तिच्या कडून मुलांची नावच ऐकली नाहियेत्.
प्रसाद: पण ती कॉलेज मधे बोलते आमच्याशी
मीनल: आम्ही म्हणजे तुम्ही किती जण आलात इथे. काय टोळीने फिरता काय.
प्रसाद: नाही, परत एकदा सॉरी आम्ही म्हणजे मीच एकटा फिरतो i mean एकटाच आहे , बोलताना जीभ घसरली (मीनल चोरून हसते ).
मीनल: बर तू पण science ला आहेस का.
प्रसाद: नाही मी commarce ला आहे. पण अकरावीतच.
मीनल: अरे मग तर तुला ती ओळखण्याचा प्रश्नच नाही येत.
प्रसाद: अहो ताई तस नाही आम्ही शाळेत असल्या पासून एकत्र होतो.
मीनल: ताई नको म्हणूस, अजुन तू त्रयस्थ आहेस.
प्रसाद: पण ती तर दर तीन वाक्यात सततं मीनलताई , मीनलताई अस नाव घेते तुमच.
मीनल: पण तेवढ़यामूळे ती तुला ओळखते अस सिद्ध होत नाही
प्रसाद: पण तिला का नाही बोलावत आपण माई.
मीनल: ते तुझी ओळख पटल्यावर आम्ही ठरवू आणि जर नाहीच पटली तर मात्र पोलिसाना बोलवाव लागेल.
प्रसाद: (घाबरुंन ) अहो नाही मी खरच तनुश्रीने बोलावल म्हणून आलोय. तिला माहीत आहे, अहो ताई, सॉरी माई, i mean आई
मीनल: (प्रचंड हसु लपवत) कोण तनुश्री असा किती जणांच्या घरी जातोस तू.
प्रसाद: तनुश्री कोण तनुश्री म्हणजे अजुन एक बहिण आहे का तुम्हाला
मीनल: अरे प्रस् का साद तूच आता म्हणालास तनुश्रीला बोलवा.
प्रसाद: अहो नाही ते घाबरुंन निघाल तोंडातून परत.
मीनल: परत जीभ घसरली का रे. (आलेलं हसू परत लपवत).
प्रसाद: हो , बर मी निघु का ……
मीनल: आता थांबच तू. (प्रसाद तेवढ्यात जायला वळतो ).
मीनल: थांब अरे थांब तू. आता फोनच करते थांब तू .
तेवढ्यात तनुजा आतून येते अग ताई तू म्हणजे खरच height आहेस. अग आधीच तो
लाजाळू आणि ससा टाइप आहे. तो परत कधीच येणार नाही आणि बोलणार नाही माझ्याशी. त्यात अख्या कॉलेज मध्ये एकच
मित्र आहे माझा. तू जा आता आत. आम्हाला बोलूदेत
मीनलताई आत जाता जाता सॉरी प्रस्, तनू मित्र चांगला आहे तुझा, by the way pras you are a nice friend. चल मी येते तनू .
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment