बाबा
एक झाकोळलेला आनंदाचा दिवस
बाबाच्या आठवणीने, काजळलेला दिवस।।
कधी कधी सुख दुःखाच्या ओंजळीतून येत
अश्या वेळी सुख अभ्रकासमान भासत।।
कुणाला दाखवाव कुणापासून लपवाव
आनंदाच्या झाडावर कस जाऊन बसाव।।
प्रत्येक प्रसंगात तुझी चाहूल असते तुझीच छाया
फ़क्त मलाच माहीत रे तुझ्या पोटातील माया।।
कुबेराच् धन तरी रीत करून काय होईल
तुझ्या प्रेमाच पीक सांग कुठे हाती येईल।।
आईच् प्रेम उण नाही बात सांगतो नक्की
पण तुझी माझी गट्टी घट्ट होती पक्की।।
आई आहेच ख़ास पण तूच रे तिचा श्वास
एकटी असते तेंव्हा सांगतो फक्त आमच्यासाठीच हास ।।
देवाला म्हणालो कारे नेलस आमच एक पान
भूमितीच् बदललीस काढून चौकोनाचा एक कान ।।
मला तरी कुठे कधी जगाच् राज्य पाहिजे होत
तुझ्या बरोबर एक डाव एकदा तरी जगायच होत ।।
खुप काही मिळविन तेवढी जिद्द तूझीच माझ्यात
खंत सतत एकच की तूच नाहीस आमच्यात ।
खंत सतत एकच की तूच नाहीस आमच्यात।।

Comments
Post a Comment