तू पावसाळी मेघ मी वर्षेतला शहारा
तुज वीण प्रेमा आपुल्या येईल का रे मोहरा
तू पावसाळी .....
तू रात्र मी निशिगंध तो
तू बकुळ मी रे गंध तो
तू श्यामवर्णी श्याम तो
अन मी तुझी रे बनसरा
तू पावसाळी ........
तुजवीण मी अर्धीच रे
तू कृष्ण मी राधिच रे
तू मोहूनि मजला असा
अन शहर मी उरलीच रे
तू पावसाळी ......
ती वेल बकुळ लाजलि
ती नागचंपा साजलि
तो एक प्रेमाचा झरा
हृदयात प्रीती बहरली
तू पावसाळी ......
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment