ध्यानी तुझ्या
ध्यानी तुझ्या आहेचना स्वप्नि तुझी संवेदना
हसुनि प्रिया तुज पाहते माझ्या मनी आहेसना
ध्यानी ..........
तू राजसा नेलेस रे हे मन तुला जे वाहिले
हां जीव उरुनी राहसी सर्वस्व तुज मी वाहिले
माझ्याच असती ज्या खुणा सर्वात त्या तू माईना
हसुनि ........
जे वेड लावून पाहिले ते हास्य मज तू दे सखे
जाणीव स्वप्नि पाहतो तो भास तू प्रतिमेत दे
तू जे मला मन वाहिले त्याचे मुके पण जाईना
ध्यानी तुझ्या सखया तुझा स्वप्नि तुझी या मूर्तना
या जीवनी यावेस तू हे वाटते आता सख्या
मनमन्दिरी असतोस तू जाणीव वेडी हो सख्या
जे स्वप्न डोळा पाहिले ते पूर्ण तू करशीलना
हसुनि ........
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment