सोनसकाळी नदी किनारी भेटाया तू यावे
वेड लावले जीवास तू माझे होऊन जावे
सोनसकाळी .........
मधात भिजली फुले दाटली अलिंगती भ्रमराते
धुंद शर्वरी नाद मधुर तो हिरवी हिरवी शेते
अश्याच वेळी मनास वाटे प्रेमगीत तू गावे
सोनसकाळी ..........
पशुपक्ष्यांची जिथे अनामिक ओढ़ जीवा लागते
तिथे निर्मिती निसर्गाची त्या ओसंडून वहाते
अश्या ठिकाणी मनास वाटे तू मजला भेटावे
सोनसकाळी ........
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment