वसंतातले तुझे रूपेरि गोफण नजरेचे
मला बांधुनि ठेवती भिवई तीर धनुरेचे
तुझे हास्य सखी निर्मल जल हे वाहुदे सहवे
त्या धारेसम मनी अनामिक ओढ़ ही जाणवे
दर्शन व्हावे मधुर तुझ्या त्या मुखकमलाचे
वसंतातले .......
तुझ्या लोचनी सारे गवसे मज जे भावे
करिसी तो मग खेळ मिटूनि पापण्याते
सदा तुझ्या त्या नेत्रपल्लवी मन हे विराजे
वसंतातले ......
गालावरती चुरले असती गुलाब पुष्पे बहुत
बटा तुझ्या काळ्या मेघावरती करती मात
या सर्वावर सदा तुझे ते सुंदर रूपच साजे
वसंतातले ........
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment