तुला पाहिले हसताना
तुला पाहिले हसताना अन
फुलांची जशी पाकळी बोलली
तुझे लाजणे भासते हे जणू की
जशी चंद्रिका ही नभी चालली
तुला पाहिले .........
तू गाली अशी हाससी मखमली की
फिरे पंख हे जणू अंगावरी की
तुला पाहिले .........
तुझे शब्द हे स्पर्शति कान ऐसे
जणु भासते वाजते बासरी
तुला पाहिले ......
तूझी चाल हे हाल करते जीवाचे
हृदयास भासे जणु शर्वरी
तुला पाहिले .........
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment